Gram Panchayat election results : वाहेगाव साळमध्ये नम्रता ग्रामविकास पॅनलचाच बोलबाला; ८ सभासद विजयी

अरविंद आहेर
Monday, 18 January 2021

बहुचर्चित वाहेगाव साळ (ता. चांदवड) ग्रामपंचायतीत प्रस्थापित व माजी उपसरपंच महेश न्याहारकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत नव्याने तयार करण्यात आलेल्या युवा पिढीच्या नम्रता ग्रामविकास पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. 

वाहेगाव साळ (नाशिक) :  बहुचर्चित वाहेगाव साळ (ता. चांदवड) ग्रामपंचायतीत प्रस्थापित व माजी उपसरपंच महेश न्याहारकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत नव्याने तयार करण्यात आलेल्या युवा पिढीच्या नम्रता ग्रामविकास पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. 

सर्वच्या सर्व ८ सभासद विजयी 

जय हनुमान ग्रामविकास पॅनल विरुद्ध नम्रता ग्रामविकास पॅनल अशी लढत झाली असून यात जय हनुमान ग्रामविकास पॅनलचा ऐतिहासिक पराभव स्वीकारावा लागला आहे. नम्रता ग्रामविकास पॅनलचे सर्वच्या सर्व ८ सभासद विजयी झाले. वार्ड क्रमांक एकमधून संदीप पवार ३०५, मेघा मंडलिक २६५, अश्विनी ललित खैरे ३१३ मतांनी तर वार्ड क्रमांक दोनमध्ये  तब्बल २० वर्षांपासून सदस्य असलेल्या देवा सोनवणे यांना मात्र संदीप खुरसने यांनी ४१४ मतांनी पराभूत केले. सीमा न्याहारकर ३५६ मतांनी विजयी. वार्ड क्रमांक तीनमध्ये रोहिदास नेटारे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे येथील उर्वरित दोन जागांसाठी केशव खैरे ३३५ मते मिळवत तर सविता दीपक खैरे ३६० मतांनी तसेच अर्चना मंडलिक ३४० मते घेत विजयी झाल्या. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

सत्ता नवीन पिढीच्या हातात दिल्याने गावातील महत्वाचा पाणी प्रश्न, हागणदारी मुक्त गाव होईल कि नाही, स्ट्रीट लाईट, आर्मी, पोलीस तयारी करणाऱ्या तरुणांच्या व्यायाम शाळा व १६०० मीटर ट्रॅक, चा प्रश्न सुटेल कि नाही यावर सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vahegaon sal gram panchayat result nashik election news