‘व्हॅलेंटाइन डे’ अन् वीकेंड! तरुणाईची इगतपुरी-भंडारदऱ्याला पसंती 

गौरव परदेशी
Monday, 15 February 2021

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक अशा मोठ्या शहरांमधून प्रेमीयुगल, तरुण- तरुणी, पर्यटकांनी इगतपुरी परिसरातील भावली धरण, कसारा घाट, वैतरणा धरण, अशोका धबधबा आदी ठिकाणी गर्दी केली होती.

खेडभैरव (जि.नाशिक) : ‘व्हॅलेंटाइन डे’ शहरी भागात मोठ्या उत्साहाने प्रेमीयुगलांकडून साजरा होतो. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये गर्दी टाळण्यासाठी, नियमांची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी होत असल्याने या वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक अशा मोठ्या शहरांमधून प्रेमीयुगल, तरुण- तरुणी, पर्यटकांनी इगतपुरी परिसरातील भावली धरण, कसारा घाट, वैतरणा धरण, अशोका धबधबा, भातसा रिव्हर व्हॅली,

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

भंडारदरा परिसरातील कळसूबाई, रंधा फॉल, सांधन व्हॅली, रतनगड, कुलंग, अलंग या छोट्या- मोठ्या पर्यटनस्थळांना पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे वीकेंड आणि रविवार असल्याने परिसरात पर्यटकांची चांगलीच रेलचेल होती. महाविद्यालये बंद असल्याने शहरांमधील तरुणाईने ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांना पसंती दिली. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.

व्यावसायिकांना दिलासा 
लॉकडाउनमुळे पर्यटनबंदी असल्याने व्यावसायिकांना यंदा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. मात्र, व्हॅलेंटाइन डेनिमित्त पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल, रिसॉर्ट्स, अन्य छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला. 
 

 

आम्ही दोन- तीन वर्षांपासून व्हॅलेंटाइन डे मुंबईतील उद्यान आणि हॉटेलमध्येच साजरा करतो. मात्र, या वर्षी कोरोनाच्या भीतीने गर्दी टाळण्यासाठी मुंबई सोडून येथील थंड हवेत व मोकळ्या निसर्गात `व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेट करून निसर्गाचा आनंद घेत आहोत. -राकेश वर्मा, पर्यटक, मुंबई 
 

व्हॅलेंटाइन डेमुळे परिसरात प्रेमीयुगल, तरुण-तरुणी व वीकेंडमुळे पर्यटकांची परिसरात रेलचेल होती. कित्येक महिन्यांपासून माझा ठप्प असलेला हॉटेलचा थोड्या फार प्रमाणात व्यवसाय झाला. -एकनाथ खाडे, हॉटेल व्यावसायिक, भंडारदरा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentines Day celebrations Igatpuri Bhandardara nashik marathi news