Valentine Day 2020 : विवाहासाठी अनेकांनी साधला व्हॅलेंटाईनचा मुहूर्त!

love marriage in valentine day.jpg
love marriage in valentine day.jpg

नाशिक : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून या दिवशीच लग्नगाठ बांधण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. 
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेकजण आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण क्षण आठवणीत राहावा यासाठी दरवर्षीच साखरपुडा किंवा लग्नगाठ बांधतात. शुक्रवारी (ता.14) मोठी लग्नतिथी असल्याने शहरातील अनेक लॉन्स, हॉटेल्स, मंगलकार्यालयांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. 

काहीतरी हटके करण्याचा प्रयत्नात तरुणाई...

14 फेब्रुवारी ही लग्नतिथी मोठी असल्याने शहरातील सर्वच लॉन्स, मंगल कार्यालय, हॉटेल्स आधिच बुकिंग करण्यात आलेली होती. प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅनिंग होते. कुणी डॅमवर, रिसॉर्टवर, कट्टयावर, हॉटेलमध्ये कॅंडललाईट डीनर तर काही ठिकाणी साखरपुडा यांसारखे कार्यक्रमाचे आयोजित केले आहेत. दरम्यान हा प्रेमाचा दिवस तरूणांकडूनच नव्हे तर सर्वच वयोगटांकडून साजरा करण्यात आला. जोडीदाराची आवड निवड जपत प्रत्येकजण यादिवशी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्नात होते. अनेकजण यादिवशी आपले प्रेम व्यक्त करत नव्या नात्याची सुरवात करतात. तर काहीजण जुनेच नाते नव्याने साजरे करतात. मात्र यादिवशीच विवाहबध्द होण्याचा फंडा गेल्या दोन- तीन वर्षांपासून ट्रेण्डमध्ये आल्याचे दिसते आहे. प्रेम दिवसाचे मुहूर्त साधत याच दिवशी रेशीमगाठी बांधण्याचा अनेकांकडून प्रयत्न करण्यात आला. 

विवाहसोहळ्यांना उधाण...

शुक्रवारी शहरात साधारणतः तीस ते पस्तीस विवाह सोहळे झाले. विवाहासाठी मंगल कार्यालय किंवा लॉन्समालकांकडून 1 लाख 81 हजारापासून तर 10 लाखांपर्यंतचे 
पॅकेज दिले जातात. त्यात हळदी समारंभापासून तर बिदाईपर्यंतचा सर्व खर्च एकत्रित केलेला असतो. पार्लरकडून 5 ते 10 हजारापर्यंत मेकअपचा खर्च घेतला जातोय. 
नववधूंकडून सध्या ट्रेंण्ड कुठला आहे, यावरुन कपड्यांना तसेच मेकअपला पसंती देण्यात येत आहे. दरदिवशी विवाह नोंदणी कार्यालयात साधारणतः 4 ते 5 विवाह नोंदणी होतात. मात्र महिन्याची 1 तारीख किंवा काही खास दिवस असला की हा आकडा 10 किंवा 15 वर जातो, असे संबधित कार्यालयाकडून 
सांगण्यात आले. 


विवाह नोंदणी कार्यालयात सरासरी 5 विवाहांची नोंदणी दररोज केली जाते. परंतु खास दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारीच्या दिवशी विवाह नोंदणीची संख्या दुप्पट होते.  नागरिकांचा कल आता विवाह नोंदणीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. - संजय ठाकरे, सहदुय्यम निबंधक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com