परतीच्या पावसाचा तडाखा! भाजीपाल्याला महागाईची फोडणी; गृहिणांचे बजेट कोलमडणार

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 15 October 2020

अतिपावसामुळे शेतशिवारात पाणी साचून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झाल्याने विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. त्यातूनच हा भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

नाशिक/ येवला : जोरदार परतीच्या पावसाने दमदार खरिपाच्या विविध पिकांना फटका बसला आहे. यामुळे  शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. साहजिकच भाजी मंडईतील विविध भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. भाजीपाला खरेदी करताना सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

विविध खरीप पिकांचे नुकसान

अतिपावसामुळे शेतशिवारात पाणी साचून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झाल्याने विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. त्यातूनच हा भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. परतीच्या पावसाच्या तडाख्यात शेतशिवारातील विविध खरीप पिकांचे नुकसान होतानाच भाजीपाल्याला देखील मोठा फटका बसला आहे. परिणामी भाजी मंडईत भाज्यांची आवक कमी होवून त्याचा दृश्य परिणाम बाजारपेठेत दिसू लागला आहे.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

काही भाज्या पूर्वीच्या दरानेच

भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने साहजिकच मंडईतील विविध भाजीपाल्यांचे दर वाढल्याने ग्राहकांना खिशाला त्याची झळ बसली आहे. घाऊक अन् किरकोळ बाजारपेठेत भाज्यांना महागाईची फोडणी बसली आहे. पण काही भाज्या जसे की कोथिंबीर जुडी, वांगी, भेंडी या भाज्या पूर्वीच्या दरानेच मिळत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

असे आहेत दर

मेथीची जुडी-२५ रुपये
गिलके-६० रुपये किलो
दोडके-८० रुपये किलो
सिमला मिरची-८० रुपये किलो
गवार-१०० रुपये किलो
बटाटे -  ६० ते ७० रुपये
टोमॅटो -  ३० ते ४० रुपये
वालच्या शेंगा-८० रुपये किलो
फ्लॉवर- ८० रुपये किलो
कोबी-२५ रुपयाला गड्डा
हिरवी मिरची-७० रुपये किलो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetables price increased yeola nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: