नाशिकमध्ये VIचे नेटवर्क बंद! ग्राहक त्रस्त; स्टोअर्सही बंद

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 15 October 2020

आज (ता.१५) अचानक व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज सकाळी नेटवर्क डाऊन असल्याने VI चे स्टोअर्सही बंद दिसले. 

नाशिक : आज (ता.१५) अचानक व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज सकाळी नेटवर्क डाऊन असल्याने VI चे स्टोअर्सही बंद दिसले. 

ट्विटरवर डाऊन ट्रेंड्स

विशेष म्हणजे ट्विटरवर व्होडाफोन आयडिया नेटवर्क (Vodafone Idea network) डाऊन ट्रेंड्स सुरु आहे. नाशिकमध्ये VIचे युजर्स त्यांच्या नंबरसह कनेक्टिव्हिटीच्या समस्यांच्या तक्रारी करत आहेत. नाशिकसह पुणे गोवा, सांगली, मुंबई तसेच सातारा भागात VI च्या कनेक्टिव्हिटीला अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी रात्रीपासूनच इंटरनेटचा वापर करण्यात अडचणी येत असल्याचे युजर्सनी सांगितले आहे. तसेच काही युजर्सनी रिचार्ज केला असून त्यांचे प्लॅन्स अजून ऍक्टीवेट झाले नसल्याच्या तक्रारीही ट्विटरवर VI युजर्स करत आहेत.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

युजर्सकडून विविध तक्रार

सध्या VI डाऊन आहे का? कोणतेही पेमेंट होत नाहीये तसेच 199 किंवा 198 वर फोनही लागत नाही.' अशी तक्रार युजर्सकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 416416 या भागातील व्होडाफोनची सुविधा रात्रीपासून विस्कळीत झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास आहेत त्यांनाही नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. तशी माहिती विद्यार्थी ट्विट करून देत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VI network stopped in Nashik marathi news