तडीपार आदेशाचे उल्लंघन करणे चांगलेच पडले महागात; नाशिकरोड पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

वारंवार सूचना देऊनही तो करत होता गुन्हे. परिसरातील नागरिकही त्याच्या असण्याने होते भयभीत. चार महिन्यांपूर्वीच त्याला तडीपार केले असूनही तो फिरत होता बिनधास्त. शेवटी पोलिसांनी मुसक्या आवळल्याच. वाचा काय घडले?

नाशिक : वारंवार सूचना देऊनही तो करत होता गुन्हे. परिसरातील नागरिकही त्याच्या असण्याने होते भयभीत. चार महिन्यांपूर्वीच त्याला तडीपार केले असूनही तो फिरत होता बिनधास्त. शेवटी पोलिसांनी मुसक्या आवळल्याच. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी शुभूम ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २५) यास २ जून २०२० रोजी नाशिक शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असतांना शुभूम न्यायालय व संबंधित शासकीय अधिकार्‍याची परवानगी न घेता देवळाली गावातील राहत्या घरी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याने तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (ता. २७) राजवाडा, देवळाली गावामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे तडीपारीची कारवाई केलेला गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत व तडीपार आदेशाचे उल्लंघन करत घरातच वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास येताच नाशिकरोड पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of the deportation order was costly nashik marathi news