esakal | अजबच! बारा लाखांचे गाठोडे बाळगणाऱ्या 'त्या' फोटोमुळे प्रचंड मनस्ताप; काय घडले वाचा..
sakal

बोलून बातमी शोधा

viral photo hemade.jpg

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांना दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

अजबच! बारा लाखांचे गाठोडे बाळगणाऱ्या 'त्या' फोटोमुळे प्रचंड मनस्ताप; काय घडले वाचा..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांना दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

‘त्या’ फोटोमुळे खऱ्या लाभार्थ्यास प्रचंड मनस्ताप 
सोशल मीडियावर मंगळवारी (ता. ८) दिवसभर एका शेतकऱ्याच्या डोक्यावर पैशाने भरलेले गाठोडे असलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला. यात चार एकर कोथिंबिरीसाठी साडेबारा लाख रुपये शेतकऱ्याला मिळाले, अशी माहितीदेखील टाकण्यात आली. खोट्या फोटोसह बातमीदेखील एका वृत्तपत्राने चालविली. याबाबत अधिक माहिती घेतली असता या फोटोतील माहिती खरी असून, फोटोमध्ये कोणीतरी खोडसाळपणा करत विनायक हेमाडे यांच्याऐवजी दुसऱ्याच शेतकऱ्याचा फोटो वापरत व्हायरल करण्यात आला. यामुळे हेमाडे यांना दिवसभर याबाबतीत फोन येऊन विचारपूस करण्यात आल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यासह मित्र, नातेवाइकांबरोबरच परिसरातील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. माध्यम प्रतिनिधींनीदेखील त्यांच्याशी संपर्क साधत संपूर्ण माहिती घेतली. 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

बारा लाखांचे गाठोडे बाळगणारा तो फोटो खोडसाळपणातून 
हेमाडे यांनी चार एकर शेतात कोथिंबिरीचे उत्पादन घेतले होते. कोथिंबिरीच्या भावात चांगली वाढ झाल्यानंतर दापूर येथील व्यापाऱ्याने हेमाडे यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी १२ लाख ५१ हजार रुपयांमध्ये सौदा केला होता. त्या बदली त्यांना धनादेशदेखील दिला होता. मात्र मंगळवारी याबाबत सोशल मीडियावर दुसऱ्याच शेतकऱ्याचा या बातमीसह फोटो प्रसिद्ध झाल्याने हेमाडे यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

फोटोसह ‘सकाळ’मध्ये वृत्त 
‘सकाळ’मध्ये ४ सप्टेंबरला या शेतकऱ्याचा कोथिंबिरीच्या शेतात उभा असलेला फोटो विशेष वृत्तासह प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन-चार दिवसांपूर्वी या शेतकऱ्याच्या जागी भलत्याचाच फोटो प्रसिद्ध करून खोडसाळपणा करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

संपादन - ज्योती देवरे