बकरी ईदनिमित्त घरीच करा नमाज अदा..पोलीसांना सहकार्य करा - विश्वास नांगरे पाटील

bakri eid appeal.jpg
bakri eid appeal.jpg

नाशिक : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बकरी ईदनिमित्त अदा करण्यात येणारी नमाज मुस्लिम बांधवांनी घरीच अदा करावी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिककरांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. पोलिस आयुक्तालयात बकरी ईदनिमित्त झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

राज्य शासनाने दिल्या सूचना

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह शहर-ए-खतीब हाफीज हिसामोद्दीन खतीब, शहरातील मुस्लिमधर्मीय प्रतिष्ठित नागरिक व मौलाना उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याबाबत राज्य शासनाने काही सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने बैठकीत माहिती देण्यात आली. 

नियमांचे पालन करण्याचेही आवाहन
कोरोनामुळे राज्यात धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मशिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरी अदा करावी. जनावरांचे बाजार बंद राहतील तसेच नागरिकांनी ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावीत. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रात लागू केलेले निर्बंध कायम राहतील. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले. 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पोलिस आयुक्तांना निवेदन 
नाशिक: सातपूर येथील महिलेला रस्त्यावर अमानुष मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करीत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पोलिस आयुत विश्वास नांगरे-पाटील यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पलता राठोड, संघटक स्वाती बिडला, रंजना चव्हाण, रीना चव्हाण आदींनी निवेदन दिले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी रंजना चव्हाण यांना त्यांच्याच नातेवाइकांनी घरगुती वादातून २ जुलैला सातपूरला भररस्त्यात मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडिओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतरही या घटनेला आता महिना होत असताना दोषींवर कारवाई होत असल्याने हे निवेदन देण्यात आले.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com