esakal | नाशिकमध्ये असताना विश्वास नांगरे पाटलांचे अनेक यशस्वी प्रयोग! वाचा 'सिंघम'ची धडाकेबाज कामगिरी..
sakal

बोलून बातमी शोधा

vishwas-nangre-patil-nashik_.jpg

नाशिक शहरातील गाजलेला दरोडा म्हणजे मुत्थूट फायनान्स या संस्थेवर सशश्‍त्र दरोडा झाला. त्यावेळी संबधित दरोडेखोर सराईत असल्याने त्यांचा माग लागू नये यासाठी मोबाईल वापरत नव्हते. या दरोड्याचे प्लॅनींग बेऊर (उत्तर प्रदेश) जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या सराईताने केले होते.

नाशिकमध्ये असताना विश्वास नांगरे पाटलांचे अनेक यशस्वी प्रयोग! वाचा 'सिंघम'ची धडाकेबाज कामगिरी..

sakal_logo
By
संपत देवगिरे

नाशिक : गेले महिनाभर प्रलंबीत व चर्चेत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी बदलीला आज मुहुर्त मिळाला आहे. त्यामुळे आता अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यात राज्यातील पंचेचाळीस वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांची मुंबईचे नवे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदी बदली झाली आहे. तर नाशिकचे नवे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांची बदली झाली आहे.

आता कोणता नवा प्रयोग? याची उत्सुकता

थेट प्रशासकीय प्रमुख म्हणून नाशिकचे आयुक्त या पदावर झालेली विश्‍वास नांगरे पाटील यांची पहिलीच बदली होती. त्यांची सगळीकडे ख्याती असल्याने नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. नाशिक सोडतांना त्यांच्या बाबतचा नागरिकांचा रिसपॉन्स संमिश्र आहे. मात्र नवी रचना आखताना शहरात गुन्हा घडल्यास पोलिसाचां रिसपॉन्स टाईम सहा मिनीटांचा असेल असा त्यांचा दावा होता. यापुढेही तो कायम राहील का? हा चर्चेचा विषय आहे. आता ते मुंबईला जात आहे. तेथे कोणता नवा प्रयोग करणार? याची उत्सुकता आहे. 
 

नांगरे पाटलांचे नवे प्रयोग यशस्वी

नांगरे पाटील यांनी काही नवे प्रयोग शहरात केले होते, हे निश्‍चित. यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे, त्यांनी पोलिसांची ड्युटी बारा तासांवरुन सहा तासांवर केली होती. त्यासाठी तीन शिफ्ट केल्या होत्या. उद्देश होता पोलिस कर्मचाऱ्यांनी नेहेमी फ्रेश व सजग असावे. त्यासाठी एक ड्युटी मध्यरात्री सुरु होत होती. त्यामुळे हे पोलिस ड्युटीवर असतांना सजग असते. त्याचा उपयोग गस्त व गुन्ह्याची माहिती मिळाल्यास त्यावर यंत्रणा तातडीने सक्रीय होने याला गती आली. त्यासाठी हे बीट मार्शल वीस ठिकाणी तपासणी करीत. त्यावर क्‍युआर कोड द्वारे लक्ष ठेवले जात होते. हा क्‍यूआर कोड मार्शलने स्कॅन केल्यावर त्याची नोंद नियंत्रण कक्षात होत होती.याबाबत नांगरे पाटील म्हणत, सामान्यतः रात्रीच्या चोऱ्या दरोडे पहाटे तीन ते चार दरम्यान होतात. रात्री एकला पोलिस ड्युटीवर येत असत. त्यामुळे ते तप्तर असत. त्यातून दरोड्याचे प्रकार घडल्यास, त्याची माहिती अथवा तक्रार प्राप्त होताच यंत्रणा सक्रीय होते. बीट मार्शल त्याच भागात असल्याने ते सहा मिनीटांत घटनास्थळी पोहोचतात. त्याला काही वेळातच अन्य यंत्रणेचा बॅकअप मिळतो. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होतो. 

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

यापुढेही ही गती टिकेल का?.
नाशिक शहरातील गाजलेला दरोडा म्हणजे मुत्थूट फायनान्स या संस्थेवर सशश्‍त्र दरोडा झाला. त्यावेळी संबधित दरोडेखोर सराईत असल्याने त्यांचा माग लागू नये यासाठी मोबाईल वापरत नव्हते. या दरोड्याचे प्लॅनींग बेऊर (उत्तर प्रदेश) जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या सराईताने केले होते. यातील सहा दरोडेखोरांना एकमेकांची नावे देखील माहित नव्हती. तरीही माहिती मिळताच सहा मिनीटांत पोलिस तेथे पोहोचले होते. मोठे आव्हान असलेला हो तपास होता. मात्र हा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आला. त्यात नाशिक शहर पोलिसांचा रिसपॉन्स टाईम होता पाच ते सहा मिनीटे. या तपासाबाबत पोलिसांना नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक समीर शेख यांना केंद्रीय पदक मिळाले आहे. यापुढेही ही गती टिकेल का?. मुंबईत नांगरे पाटील कोणता नवा प्रयोग करणार? याची उत्सुकता कायम आहे. 

हेही वाचा >  धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे