esakal | शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश ऐच्छिकच; सुरक्षेच्या साधनांचा वापर मात्र बंधनकारक 
sakal

बोलून बातमी शोधा

school students.jpg

मार्चमध्ये लॉकडाउन झाल्याने शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शाळा उघडण्यास परवानगी दिली गेली नाही. दिवाळीनंतर शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली. पालक-शिक्षक संघटनांचे मत जाणून घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ४ जानेवारीपासून शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश ऐच्छिकच; सुरक्षेच्या साधनांचा वापर मात्र बंधनकारक 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १५ दिवस शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला असला, तरी नाशिक महापालिका हद्दीतील २०६ शाळा ४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचा निर्णय ऐच्छिक असून, ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे. 

शाळांमध्ये ४ जानेवारीपासून ऐच्छिक प्रवेश 

मार्चमध्ये लॉकडाउन झाल्याने शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शाळा उघडण्यास परवानगी दिली गेली नाही. दिवाळीनंतर शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली. पालक-शिक्षक संघटनांचे मत जाणून घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ४ जानेवारीपासून शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोना संसर्ग नाशिकमध्ये आटोक्यात असल्याने आयुक्त जाधव यांनी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना शासन निर्देशानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी नियोजनाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४ पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

प्रवेश ऐच्छिक, सुरक्षेची काळजी 
शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ऐच्छिक प्रवेश राहणार आहे. प्रवेश घेतेवेळी एकदाच पालकांचे संमतिपत्रक बंधनकारक राहील. एका महिन्यात फक्त ११ दिवस विद्यार्थ्यांना यावे लागेल. ऑड-ईव्हन पद्धतीप्रमाणे दिवसाआड वर्ग भरतील. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची तापमापक यंत्राद्वारे तपासणी होईल. ऑक्सिमीटर, सॅनिटायझर बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण उपलब्ध राहणार आहे. शहरातील २०६ शाळांमधील नववी ते बारावीचे २६ हजार विद्यार्थी आहेत. सर्दी-खोकला-ताप असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व जबाबदारी शाळांची राहील.  हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी