तब्बल शेकडो कामगारांना कोरोना होण्यास कारणीभूत 'त्या' कंपनीवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

औद्योगिक वसाहतीतील कंपन्या लॉकडाउन उठल्यानंतर अटी व शर्थींनुसार सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याप्रमाणे कंपन्या सुरू झाल्या; मात्र या कंपनीने कुठल्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्स न पाळता व योग्य ती काळजी न घेता कंपनी सुरू केली. या कंपनीतील शेकडो कामगार आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

नाशिक / वाडीवऱ्हे : औद्योगिक वसाहतीतील कंपन्या लॉकडाउन उठल्यानंतर अटी व शर्थींनुसार सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याप्रमाणे कंपन्या सुरू झाल्या; मात्र या कंपनीने कुठल्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्स न पाळता व योग्य ती काळजी न घेता कंपनी सुरू केली. या कंपनीतील शेकडो कामगार आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

कोरोना रुग्णांच्या वाढीस कारणीभूत ठरल्याचा आरोप 

वाडीवऱ्हे- गोंदे औद्योगिक वसाहतीत रुग्णसंख्या वाढीसाठी कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीने दिलेल्या तक्रारीनुसार एका कंपनीविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कंपनीने शासनाच्या आदेशाची पायमल्ली व निष्काळजीपणा केल्याने परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाडीवऱ्हे- गोंदे औद्योगिक वसाहतीतील कंपन्या लॉकडाउन उठल्यानंतर अटी व शर्थींनुसार सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याप्रमाणे कंपन्या सुरू झाल्या; मात्र या कंपनीने कुठल्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्स न पाळता व योग्य ती काळजी न घेता कंपनी सुरू केली. या कंपनीतील शेकडो कामगार आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

एका कामगाराचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या सर्व बाबींसाठी संबंधित कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचेही फिर्यादित म्हटले आहे. या वेळी ग्रामविकास अधिकारी ईश्‍वर पाटील, सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर आदी उपस्थित होते.  

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Wadiwarhe Gram Panchayat Filed a case against company nashik marathi news