....अन्यथा लोकप्रतिनिधींच्या दारातच ओतणार कांदा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

कांदाभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. आधी निर्यातबंदी हटवण्यासाठी केलेली दिरंगाई व नंतर कोरोनाच्या महामारीमुळे सततच्या लॉकडाउनमुळे राज्यातील कांदाविक्रीवर मोठा परिणाम झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दर वर्षी जूनमध्ये उन्हाळ कांद्याला मागणी वाढते व कांद्याचे भाव वाढतात. पण यंदा भाववाढ न होता दिवसेंदिवस घसरण होत आहे.

नाशिक / देवळा : मंत्री, खासदार, आमदार यांनी कांदाभावाच्या प्रश्‍नात लक्ष घालावे; अन्यथा त्यांच्या दारात कांदे ओतून आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे व राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी शुक्रवारी (ता.26) दिली. 

शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना
कांदाभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. आधी निर्यातबंदी हटवण्यासाठी केलेली दिरंगाई व नंतर कोरोनाच्या महामारीमुळे सततच्या लॉकडाउनमुळे राज्यातील कांदाविक्रीवर मोठा परिणाम झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दर वर्षी जूनमध्ये उन्हाळ कांद्याला मागणी वाढते व कांद्याचे भाव वाढतात. पण यंदा भाववाढ न होता दिवसेंदिवस घसरण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटनेचे प्रदेश संघटक कृष्णा जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे आदी पदाधिकारी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडणार आहेत. जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीच्या खरेदीत 300 ते 400 रुपयांची तफावत होत आहे. त्यासाठी पणन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. तीन महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. 

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

केंद्र सरकारने दाखवलेला ठेंगा ठरतेय डोकेदुखी
सरकारने वेगवेगळ्या पिकांचे हमीभाव जाहीर केले असले तरी कांदा पिकाबाबत सरकार उदासीन आहे. कांदाभाववाढीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून केंद्र सरकार निर्यात धोरण आखते. परंतु या वर्षी राज्य सरकारने कांद्याबाबत दाखवलेली उदासीनता व केंद्र सरकारने दाखवलेला ठेंगा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशातून कांद्याची जास्तीत जास्त निर्यात करावी व शेतकऱ्यांचा कांदा 20 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of State Onion Growers Association to government nashik marathi news