संघटित गुन्हेगारीचे डोके वर! पोलिसांचा झोपडपट्टी परिसरात वॉच; पोलिस मित्रांकडून मदत  

nashik police 09.jpeg
nashik police 09.jpeg

नाशिक रोड : नाशिक रोडला संघटित गुन्हेगारीने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी नाशिक रोड पोलिसांनी विशिष्ट परिसरात पेट्रोलिंगसह परिसरावर वॉच ठेवला आहे. यामध्ये शांतता समितीच्या सदस्यांसह पोलिसमित्रही मदत करीत आहेत. 

संघटित गुन्हेगारीविरोधात पाऊल; पोलिस मित्रांकडून मदत  
नाशिक रोडला तलवार, कोयते, गावठी कट्टा बाळगणारी गॅंग आढळली आहे. ही संघटित गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. एचएएल आणि सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात पकडलेल्या हेरगिरीच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प, नाशिक रोड व उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्त कडक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला जात आहे. 

अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांचा वॉच 
कॅनल रोडची तीन किलोमीटरवर असलेली झोपडपट्टी, राजवाडा, गुलाबवाडी, गुलजारवाडी, गोरेवाडी, पवारवाडी, फर्नांडिसवाडी, गुन्हेगारांचा अड्डा असणारी स्वप्नील इमारत, रोकडोबावाडी, देवळालीगाव, अरिंगळे मळा, सिन्नर फाटा, मंगलमूर्तीनगर, भीमनगर, स्टेशनवाडी, रेल्वेस्थानकाच्या आसपासचा परिसर, डोबी मळ्याजवळील मोकळ्या जागा, विहितगाव, देवळालीगाव या परिसरांतील झोपडपट्ट्यांध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविली आहे. 

कट्टा बाळगणाऱ्यांवर कारवाई 
नाशिक रोड येथे कट्टा विकणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय आहे. सिन्नर फाटा परिसरात असणाऱ्या अरिंगळे मळा, फर्नांडिसवाडी, स्वप्नील इमारत, गंधर्वनगरी, रोकडोबावाडी येथून आजपर्यंत गावठी कट्टयासह आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर पोलिस सध्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहेत.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com