
नाशिक : (येवला) शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव कोरडा पडल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट होते. मात्र, पाठपुराव्यानंतर पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने येवलेकरांवर पाण्याचे संकट टळले आहे. गुरुवारी सायंकाळी पाणी तलावात पोचले असल्याने आता शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकेल.
गढूळ पाणीपुरवठा
शहराला गंगासागर तलावालगतच्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावातून पाणीपुरवठा होतो. पालखेड जलसंपदा विभागातर्फे मार्चच्या शेवटी दिलेले पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन यातून पाणी साठवण तलाव भरून देण्यात आला होता. पालिकेच्या टप्पा क्रमांक दोन साठवण तलावात सुमारे 44 दशलक्ष घनफूट पाणी त्यावेळी मिळाल्याने जवळपास गेली अडीच महिने शहरवासीयांना पाणीपुरवठा करणे पालिकेस शक्य झाले होते. दहा दिवसांपासून तलाव तळ गाठत आल्याने पाणीपुरवठा विभागाने तारेवरची कसरत पाणी पुरवले. दोन दिवसांपूर्वी या साठवण तलावातील पाणी संपुष्टात आल्याने साठवण तलावातील मृत पाणीसाठ्यातून पालिकेने पाणी शुद्धीकरण करून शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली. परंतु गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या.
तालुक्यातील 38 गाव पाणीपुरवठा योजना
महिन्यापासून शहराला चार दिवसांआड एकवेळेस हा पाणीपुरवठा सुरू होता. पाणी आटत आल्याने पालखेड कालव्याला पाणी सोडण्याची मागणी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर व प्रशासनाने केली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही टंचाईची माहिती मुख्याधिकारी नांदूरकर यांनी दिली होती. या मागणीमुळे पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार पालिका, तालुक्यातील 38 गाव पाणीपुरवठा योजना, मनमाड नगर परिषद आणि मनमाड रेल्वे यांच्यासाठी पाणी आवर्तन सोडले आहे.
पालखेड धरणातून पालखेड डाव्या कालवामार्फत मंगळवारी सोडण्यात आलेले पाणी जलदगतीने गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या टप्पा क्रमांक-2 साठवण तलावात पोचले. पाण्याचा विसर्ग बघता तीन ते चार दिवसांत पालिकेचा हा साठवण तलाव पूर्ण भरला जाणार आहे. यामुळे शहरवासीयांवरील पाण्याचे संकट टळले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.