आमदार आता कोरोना पॉझिटिव्ह म्हणायचे कि निगेटिव्ह?? कोरोना अहवालांच्या गोंधळाने मनस्ताप

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

आमदार हे कार्यकर्त्यांच्या व नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने कुठलीही लक्षणे नसताना त्यांनी शंका म्हणून तपासणी केली असता खाजगी लॅबमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवला. यामुळे संपूर्ण कुटुंब हादरले. पण त्यानंतर...

नाशिक / येवला : कोरोनाच्या अहवाल आणि उपचारांबाबत सोशल मीडियावर फिरणारे संदेश खरे आहे की काय असे कधीकधी वाटते.. कारणही तसेच आहे. येथील आमदार नरेंद्र दराडे यांचा अहवाल पॉझिटिव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत लगेच निगेटिव्ह आला तसेच कुटुंबातील ९ सदस्यांचा अहवाल नाशिकच्या लॅबमध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासगी लॅबमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे नेमका काय गोंधळ सुरू काय आहे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय होऊ पाहत आहे.

लगेच दुसऱ्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह
आमदार दराडे कार्यकर्त्यांच्या व नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने कुठलीही लक्षणे नसताना त्यांनी शंका म्हणून तपासणी केली असता खाजगी लॅबमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवला. यामुळे संपूर्ण कुटुंब हादरले.दराडे लगेच मुंबई येथे फॉरटीज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले.मात्र तेथील यंत्रणेलाही या अहवालावर विश्वास नसल्याने त्यांनी पुन्हा स्वब घेऊन अहवाल काढला असता दुसऱ्या दिवशी तो निगेटिव्ह आला. आमदार दराडे यांना डिस्टचार्ज देण्यात आला.

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

संपूर्ण कुटुंबच हादरले व प्रचंड मनस्तापही
आमदार दराडे पॉझिटिव्ह निघाल्याने लागलीच घरातील व संपर्कातील शिक्षक व आमदार किशोर दराडेसह २२ जणांचे आरोग्य विभागामार्फत स्वब देण्यात आले.यातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंबच हादरले. सर्वांना प्रचंड मनस्तापही झाला. मात्र एकालाही या आजाराचे लक्षण नसल्याने त्यांनी पुन्हा खाजगी लॅब मध्ये स्वब दिले. आज सकाळी या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यामुळे कुटुंबासह समर्थकांनी आनंद व्यक्त केला. मात्र एका लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याचा निगेटिव्ह हा सुरू असलेला गोंधळ या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

अहवालामुळे गोंधळ वाढून मनस्ताप

"आजार नसताना लॅबच्या अहवालामुळे गोंधळ वाढून मनस्ताप होत आहे. आमचे संपूर्ण कुटुंब गेल्या पाच दिवसापासून प्रचंड मनस्ताप सहन करते आहे. आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असला तरी या अहवालांच्या पॉझिटिव्ह-निगेटिव्हमुळे अनेक शंका निर्माण होत आहे.या संदर्भात मी स्वतः आरोग्य मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे."-नरेंद्र दराडे,आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What exactly happened to the confusion of the Corona reports nashik marathi news