
नाशिक : कोरोनाविषयी चुकीचा संदेश वा अफवा पसरविणारी कोणतीही बातमी, संदेश, व्हिडिओ व्हायरल वा फॉरवर्ड केल्यास व्हॉट्सऍपवरील ग्रुपच्या ऍडमिनवरच कठोर कायदेशीर करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. या कारवाईच्या भीतीपोटी अनेकांनी व्हॉट्सऍपवरील आपल्या ग्रुपकडून पर्याय शोधला जात आहे.
पोलिसांकडून खबरदारी घेत गुन्हे दाखल
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्ययंत्रणा दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत, तर सोशल मीडियावरूनही सरकारी यंत्रणेकडून जनजागृती करून कोरोनाचा सामना कसा करावा, याबद्दल जनजागृती केली जात आहे. काही अतिउत्साही नेटिझन्स कोरोनाबाबत कोणतीही शहानिशा न करता संदेश, व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवत असल्याचे आढळले. त्यामुळे शहर पोलिसांनी खबरदारी घेत गुन्हे दाखल केले आहेत.
एक प्रकारे कोरोनाचाच धसका
1 एप्रिलचे निमित्त साधून कोरोनाचा संदेश व्हायरल, फॉरवर्ड करून नागरिकांचा एप्रिल फूल करण्याचा काही जणांचा प्रयत्न पोलिसांनी आधीच ओळखला. त्यांनी कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारचा संदेश न करण्याची ताकीद देत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अनेक ग्रुप ऍडमिनने खबरदारी म्हणून मंगळवार (ता. 31)पासूनच व्हॉट्सऍप ग्रुपचे सेटिंग बदलून ओन्ली ऍडमिन केले. तसेच ग्रुपच्या सदस्यांनाही कोरोनाबाबत संदेश न पाठविण्याची सूचना केली. त्यानुसार ऍडमिनकडून सेटिंग "ओन्ली ऍडमिन' अशी करून घेत, एक प्रकारे कोरोनाचाच धसका घेतल्याचे पाहायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.