पदरी फक्त निराशाच! गल्ली ते दिल्ली पाठपुरावा करूनही नाशिक दुर्लक्षितच; वीज केंद्राचे ग्रहण काही सुटेना

nashik thermal power station.png
nashik thermal power station.png

नाशिक : (एकलहरे) नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित ६६० मेगा वॅट बदली संच दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पाच्या नंतर मंजूर झालेले संचामधून निर्मिती सुरू झाली पण नाशिकचे काम मार्गी लागले नाही. गल्ली ते दिल्लीपर्यंत निवेदन पत्रव्यवहार करूनही या प्रकल्पाचे काम तसूभरही ढळाले नाही. 

पदरात निव्वळ आश्वासनच

प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला निव्वळ आश्वासनांपलीकडे पदरात काही पडले नाही. गत सरकार मधील ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक औष्णिक वीज केंद्र भेटीदरम्यान घोषित केले होते. राज्यात औष्णिक प्रकल्प झाल्यास पहिले नाशिकलाच होईल. पण तद्नंतर कोराडी येथे ६६० चे ३ संच कार्यान्वित असतांना आणखी दोन संचाना मान्यता देण्यात आली. तीन पक्षांचे सरकार आल्यावर पुन्हा नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या. नाशिक औष्णिक वीज केंद्र व नासाकाच्या मुद्द्यावर विद्यमान आमदार निवडून आल्या पण अजून त्यांच्याही पाठपुराव्याला यश काही आले नाही. मुंबईचा वाढता विस्तार बघता व वीजेची भविष्यातील वाढती मागणी अभ्यासता एकलहरे येथे प्रकल्प होणे आवश्यक असतांना
 उरण वायू केंद्र येथे एक हजार मेगा वॅटचा प्रकल्प घोषित केला गेला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

ठळक मुद्दे

*नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित बदली संचासाठी गरेपाल्मा येथे महानिर्मिती कंपनीने खाण आवंठीत केली आहे.

* प्रस्तावित बदली संचासाठी गंगापूर धरणात पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

* नाशिक औष्णिक वीज केंद्र ६५० हेक्टर मध्ये त्यामुळे जागाची भरपूर उपलब्धता 

* रेल्वे मार्ग उपलब्ध असल्यामुळे नव्याने जमीन अधिग्रहण करण्याची गरज नाही

* नाशिक-मुंबई अंतर जवळ असल्याने वीजवहन गळती नाही

आदी सर्व बाबी उपलब्ध असतांना राजकीय पाठपुरावा कमी पडतोय म्हणून येथील प्रकल्प रखडलाय.

सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असतांना देखील नाशिक येथील बदली संचासाठी सरकार काना डोळा करतंय याचा अर्थ नाशिक येथील लोकप्रतिनिधी पाठपुरावा करण्यासाठी कमी पडतात,त्यामुळे सद्याच्या आघाडीसरकार च्या विरोधात सुद्धा उग्र असे आंदोलन उभारण्याची गरज आहे. - विनायक हारक (कार्याध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती)

संपादन - किशोरी वाघ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com