जिंकलंस पोलिसदादा! रजेवर असूनही जीवाची पर्वा न करता केलं धाडस; कामगिरीचे होतंय कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

सुट्टीचा दिवस...पत्नीसोबत कामानिमित्त गुलाब सोनार बाहेरगावी गेले होते. माघारी परतत असतांना दोन दुचाकीस्वार संशयास्पद जातांना दिसले. संशय आल्याने सोनार यांनी पाठलाग केला. ओव्हरटेक करुन करुन पुढे थांबविले असता समोर आली दुचाकीस्वारांची धक्कादायक करतूत. वाचा काय घडले नेमके?

नाशिक : सुट्टीचा दिवस...पत्नीसोबत कामानिमित्त गुलाब सोनार बाहेरगावी गेले होते. माघारी परतत असतांना दोन दुचाकीस्वार संशयास्पद जातांना दिसले. संशय आल्याने सोनार यांनी पाठलाग केला. ओव्हरटेक करुन करुन पुढे थांबविले असता समोर आली दुचाकीस्वारांची धक्कादायक करतूत. वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

गुन्हे शाखेच्या युनिट-2 मध्ये कार्यरत असलेले गुलाब सोनार हे रजा घेऊन कौटुंबिक कामासाठी संगमनेरला गेले होते. घरी पत्नीसोबत नाशिकला परतत असताना नांदूरशिंगोटेच्या पुढे काही अंतर आल्यानंतर काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दोघे युवक दुचाकीने (एम.एच 08 एल पी 5347) सुसाट वेगाने पुढे जात असल्याचे दिसले. सोनार यांनीही आपल्या गाडीचा वेग वाढवून त्यांच्या दुचाकीच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेले सोनसाखळी दुचाकी चोर आणि रस्त्यावर दुचाकीने जाणारे हे दोघे एकच असल्याची त्यांना खात्री पटली. सोनार यांनी आपल्या पत्नी व अन्य नातेवाईकाच्या मदतीने दोघा चोरट्याना शिताफीने मोहदरी घाटात ताब्यात घेतले. 

मुद्देमाल केला जप्त

त्या दोघा संशयितांची झडती घेतली असता दुचाकी, कोब्रा स्प्रे, धारदार सुरे, फायटर, चार सोनसाखळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघा सराईत गुन्हेगारांकडून शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सोनसाखळ्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट श्यक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

सोनार यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. रजेवर असुनही आपला अनुभव व कौशल्याचा वापर करत सोनसाखळी चोरांना गजाआड करण्याची एकहाती महत्वाची कामगिरी जोखीम पत्करून केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पांडेय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सोनार यांचे अभिनंदन करत कौतुक केले.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While with his wife, the police chased the gold chain thieves nashik marathi news