तुमचंही वीज बिल जास्त आलंय का?...'इथं' उत्तरे मिळणार...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे अन् त्यांना बिल मात्र, प्रमाणा पेक्षाही अधिक आले आहे. चार ते पाच आकडी बिलाने ग्राहकांना घाम फोडला असून, वीज वितरण कंपनी ग्राहकांना लुटत असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून आरोपही केला गेला. त्यापार्श्‍वभूमीवर वाढीव बिलाच्या शंका आणि त्यांविषयी वीज कंपनीने केलेले समाधान...

नाशिक : वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वीजपुरवठ्यासह अव्वाच्या सव्वा बिल देऊन 'शॉक' देणे सुरू केले. कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे अन् त्यांना बिल मात्र, प्रमाणापेक्षाही अधिक आले आहे. चार ते पाच आकडी बिलाने ग्राहकांना घाम फोडला असून, वीज वितरण कंपनी ग्राहकांना लुटत असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून आरोपही केला गेला. त्यापार्श्‍वभूमीवर वाढीव बिलाच्या शंका आणि त्यांविषयी वीज कंपनीने केलेले समाधान...

1) बिल जास्त आहे असे बिलावरून स्पष्ट दिसते. 

बिल जास्त येण्याची कारणे अशी असू शकतात :
अ) संपूर्ण उन्हाळ्यात पूर्णवेळ घरात राहून केलेला वापर हे पहिले कारण असू शकते. 
ब) मागील बिल रकमेशी तुलनेवरुन बिल जास्त आले पण लॉकडाऊनमुळे महावितरणने रिडींग घेतले नव्हते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याची बिले ही जानेवारी फेब्रुवारी - मार्च (हिवाळी महिन्याच्या सरासरी) नुसार दिलेली 
आहेत. या तीन महिन्यात वर्षातील वीज वापर सर्वात कमी असतो. एप्रिल मे जून या तीन महिन्यात सर्वात जास्त असतो. त्यामुळे हिवाळ्यातील बिलाची उन्हाळ्याच्या बिलाची तुलनेमुळे बिल रक्कम जास्त वाटत आहे. 
क) तिसरे दरमहा बिल भरत असल्याने बिल रक्कम जाणवत नाही परंतु लॉकडाउन मुळे ग्राहकांनी बिले भरली नव्हती त्यामुळे तीन महिन्याचे एकत्रित बिल आलेले असल्याने रक्कम जास्त वाटत आहे. परंतु या जूनच्या तीन महिन्यांच्या बिलाची आपण मागच्या वर्षीच्या एप्रिल मे जून या 3 महिन्याशी तुलना केल्यास वीज बिल बरोबर असू शकेल 
ड) चौथे महत्वाचे कारण म्हणजे, 1 एप्रिल 2020 पासून नवीन वीज दर वाढलेले आहेत, त्यामुळे रकमेत तो फरक पडला आहे. 
इ) मिटर रिडींग चुकले तर बिल चुकू शकते त्यामुळे मिटर रिंडीग बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावे. बिलावरील रिडींग हे मिटर वरील रिडींग पेक्षा जास्त असल्यास वीज कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. 

2) तीन महिन्याचे एकत्रित बिल आल्याने बिलात जादा दर लागलेला आहे. 

अजिबात नाही.. वीज वापर तीन महिन्याचा असल्याने एकूण वीज वापराला 3 महिन्याने भागून एका महिन्याचा सरासरी वीज वापर (स्लॅब) काढला आहे. त्यानंतर तीन महिन्यांनी रक्कम काढली. जर 3 महिन्याचे 300 युनिटचे बिल आलेले असेल. 303/3= 101 म्हणजे प्रत्येक महिन्याला 101 युनिट वापर झाला असे समजून पहिल्या 100 युनिटला 3.46 रुपये आणि 1 युनिटला 7.43  रुपये दर लावला आहे. एका महिन्याची रक्कम_ _(100*3.46)+(1*7.43) = 353.43 रुपये__3 महिन्याची रक्कम (353.43*3)= 1060.29 रुपये. _307 युनिटचा वापर असेल असेल तरी 300युनिट वरील स्लॅब 10.32 रुपये प्रति युनिट (303*10.32= 3126.97) लावलेला नाही किंवा 101 युनिट एका महिन्याचा आहे म्हणून (101* 7.43=759.43 प्रति महिना) लागलेला नाही. वरील दोन्ही पेक्षा कमी लागलेला आहे, कारण वापर हा तीन महिन्याचा आहे. 

3) लॉकडाउन काळात महावितरण कंपनीने ग्राहकांना लूटले आहे, विविध आकार बिलात लावत आहे?

महावितरण कंपनी ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, तिला खाजगी प्रमाणे लूटता येत नाही. विजेचे दर सुद्धा कंपनी ठरवत नाही. वीज नियामक आयोग जे वीज दर ठरवून देतात, तेच दर लावले जातात. वितरण कंपनीला मनमानी करता येत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव जसे दिवसेंदिवस बदलतात तसे वीज दराबाबत होत नाही. नुकतेच 5 वर्षाचे वीज दर निश्‍चित केलेले आहेत. त्यानुसारच आकारणी केली जाते. ही दर निश्‍चिती लॉक डाउनपूर्वीच झालेली आहे. 

4) सरासरी बिल काय भानगड आहे? एप्रिल आणि मे ची बिले आम्हाला दिलेलीच नाही तर त्याची रक्कम कशी आली?

जेव्हा काही कारणाने रिडींग घेणे शक्‍य नसते तेव्हा सरासरी बिल देण्याची सोय आहे. मागील तीन महिन्यांतील सरासरी वापराएवढे असते.  एखाद्या वेळी रिडींग कालावधीत ग्राहक बाहेर गावी गेलेले असाल तेव्हा असे बिल आलेले असेल. लॉक डॉऊनमध्ये अत्यावश्‍यक सेवा सर्व कामे बंदचे शासनाचे आदेश असल्याने रिडींग आणि बिल वाटप वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगित होते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात ग्राहकांना सरासरी युनिटची देयके ऑनलाईन, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मॅसेजने कळविण्यात आली. 

हेही वाचा > VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

5) तीन महिन्याचे बिल दिले परंतु आम्ही तर मागील दोन बिलाची रक्कम भरली आहे. त्याचे काय? 

मागील सरासरी देयकाची रक्कम भरली असेल तर ती रक्कम जूनच्या रिडींग नुसार आलेल्या बिलातून वजा सरासरी देयकाची रक्कम या शीर्षकाखाली (स्थिर आकार व त्यावरील वीज शुल्क वगळून) वजा केली आहेत. त्यामुळे जी बिलाची रक्कम अदा करता त्यापेक्षा स्थिर आकार आणि त्यावरील वीज शुल्क एवढ्या रकमेने कमी दिसेल. 

6) सरासरी बिलातील स्थिर आकाराची रक्कम का वगळली नाही? 

स्थिर आकार हा जून महिन्याच्या बिलात केवळ एकाच महिन्याचा लावलेला आहे व इतर आकार तीन महिन्याचे, त्यामुळे इतर आकारातून मागिल दोन महिन्याचे आकार वजा केले आहे. त्याप्रमाणे स्थिर आकार वजा केलेला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

7) लॉकडॉऊन मध्ये बिल भरू शकलो नाही त्यामुळे त्यावरील व्याज व दंड माफ व्हायला पाहिजे.

लॉकडाउनच्या मार्च, एप्रिल आणि मे च्या बिलांत 31मे पर्यंत कुठलेही व्याज किंवा दंड रक्कम न भरल्याने लावलेला नाही. 

8) तीन महिन्याचे एकत्रित बिल आल्याने आम्ही भरू शकत नाही यात सूट मिळू शकेल का?

ऊर्जा मंत्र्यांनी यांनी वीज ग्राहकांना सुलभ हफ्ते दिले जातील असे सांगितले आहे, त्यामुळे आपल्याला हफ्ते करून लागल्यास वीज कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संर्पक साधावा. वीज बिलाची रक्कम कशी काढली आली याबाबत सविस्तर माहिती खालील लिंकवर दिलेली आहे. 
https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is the light bill high? Check it out nashik marathi news