कोरोना निदानासाठी तब्बल 'इतक्या' ॲन्टिजन किटची खरेदी...मनपाचा निर्णय!

antigen test.jpg
antigen test.jpg

नाशिक : कोरोनाचे जलदगतीने निदान करण्यासाठी महापालिकेने सुरवताीला नऊ हजार ८०० ॲन्टिजन किट खरेदी केल्या होत्या. आता पुन्हा नव्याने ९० हजार किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जलदगतीने कोरोनाचे निदान करताना तातडीने उपचार करून मृत्युदर कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आता मालेगावलाही मागे टाकले आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वडाळागाव, जुने नाशिक, पंचवटीतील फुलेनगर या भागात महापालिकेने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यादृष्टीने कोरोनाचे निदान लवकरात लवकर होण्यासाठी रॅपिड ॲन्टिजन किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी स्वॅब घेतल्यानंतर लॅबचा अहवाल प्राप्त होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. संबंधित पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नातेवाइकांचेही स्वॅब घेतले जातात. मात्र, अहवाल हाती येताना अधिक कालावधी लागत असल्याने अधिक प्रसार होण्याची शक्‍यता आहे.

आयुक्तांनी दिली सूचना

कोरोनाचे निदान लवकरात लवकर होण्यासाठी रॅपिड ॲन्टिजन किटद्वारे तपासणीला सुरवात करण्यात आली. शासनाकडून प्राप्त झालेले चार हजार ८०० व महापालिकेने खरेदी केलेले पाच हजार असे एकूण नऊ हजार ८०० किटद्वारे तपासणी सुरू झाली आहे. आता आणखी आयसीएमआर मान्यताप्राप्त कंपनीकडून ९० हजार ॲन्टिजन किट खरेदी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

लक्षणे नसलेल्यांची तपासणी

रॅपिड ॲन्टिजन किटद्वारे तपासणी करताना ताप, सर्दी, खोकला असलेल्या, तसेच अतिजोखमीच्या व्यक्तीच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या हृदयविकार, मूत्रपिंड विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, गरोदर मातांची तपासणी केली जात आहे. वडाळागाव, फुलेनगर भागात वैद्यकीय पथकांमार्फत रॅपिड ॲन्टिजन तपासण्या केल्या जात आहेत. आता पुढील टप्प्यात नाशिक रोड भागातील गोसावीवाडीत अधिक संख्येने रुग्ण आढळत असल्याने येथे चाचण्या केल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com