विजयी उमेदवारांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावे - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ यश मिळाले आहे.  राज्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मन:पूर्वक अभिनंदन व्यक्त केले.

नाशिक : राज्यभरात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 18) रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ यश मिळाले आहे.  राज्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मन:पूर्वक अभिनंदन व्यक्त केले. गावाच्या विकासाच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, गावाच्या विकासासाठी पक्षभेद विसरून विजयी आणि पराजय झालेल्या सर्व उमेदवारांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गावाच्या विकासासाठी एकत्र या...

छगन भुजबळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेचा ग्रामपंचायत हा महत्वाचा कणा असून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्वाचं केंद्र आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर त्यांचा परिणाम हा राज्याच्या विकासावर होत असतो. नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीतून होत असते. त्यामुळे याठिकाणी काम करतांना एकमेकांमधील मनभेद, पक्षभेद बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असते. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

निवडणुकीत महाविकास आघाडीला नागरिकांनी भरभरून असे मतदान केल्याचे बघावयास मिळाले आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो. तसेच, जय व पराजय विसरून सर्वच उमेदवारांनी तसेच नागरिकांनी एकत्र येत गावाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: winning candidates should bring about overall development of village nashik marathi news