VIDEO : वणीच्या आदिमातेचा चैत्रोत्सव भाविकांविनाच..घरबसल्या करा देवी सप्तश्रृंगीचे दर्शन!

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गड (वणी) चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याने भाविकांविनाच चैत्रोत्सवातील आदिमातेचा चैत्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी करुन  पुरोहित दैनंदिन आदिमातेच्या पुजाविधी करीत आहे. भाविकांना घरबसल्या आदिमायेच्या चैत्रोत्सवातील पंचामृत महापूजा आरती व दर्शन उपलब्ध करुन देत आहोत, सकाळच्या माध्यमातून...

नाशिक / वणी : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास गुरुवार (ता. २) पासून प्रारंभ झाला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गड (वणी) चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याने भाविकांविनाच चैत्रोत्सवातील आदिमातेचा चैत्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी करुन  पुरोहित दैनंदिन आदिमातेच्या पुजाविधी करीत आहे. भाविकांना घरबसल्या आदिमायेच्या चैत्रोत्सवातील दिवसाची पंचामृत महापूजा आरती व दर्शन उपलब्ध करुन देत आहोत, सकाळच्या माध्यमातून...

आदिमाया भगवतीच्या मंदिरात दैनंदिन पंचामृत पूजा व आरती, आदिमायेचे ऑनलाइन दर्शन ट्रस्टच्या वेबसाईटवर भाविकांना घरबसल्या घेण्याची व्यवस्था ट्रस्टने केली आहे. तसेच व्हॉट्‌सऍप, फेसबुक आदी सोशल मीडियातून आदिमायेच्या मूर्तीचे रोजचे छायाचित्र नियमित प्रसारित करण्यात येत आहे. या माध्यमांतूनच भाविकांनी घरात बसूनच आदिमायेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन न्यासाने केले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without the devotees godess saptashringi festival of navratri vani nashik marathi news