वाहनचालकाने थेट महिलेच्या अंगावर घातली गाडी; वाहनचालकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

महिलेच्या पोटापासून चेहऱ्यापर्यंत चाक गेल्याने ओळख पटू शकली नाही. पोलिस कर्मचारी भरत कांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक राकेश शेवाळे अधिक तपास करीत आहे.

नाशिक / सिडको : महामार्गावर स्वामी विवेकानंदनगर समोरील उड्डाणपुलावर वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने महिला ठार झाली. या प्रकरणी अंबड पोलिसांत अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला.

उड्डाणपुलावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू 

महामार्गावर सिडकोतील स्वामी विवेकानंदनगरसमोरील उड्डाणपुलावर रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात वाहनाचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने महिला जागीच ठार झाली. अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक राकेश शेवाळे व कर्मचारी घटनास्थली पोचले. अपघातात ठार झालेल्या महिलेच्या पोटापासून चेहऱ्यापर्यंत चाक गेल्याने ओळख पटू शकली नाही. पोलिस कर्मचारी भरत कांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक राकेश शेवाळे अधिक तपास करीत आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे
पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडू नये, यासाठी लाखो रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार केला आहे. मात्र भुयारी मार्गातून एकटादुकटा प्रवास धोकादायक झाला आहे. भुयारात बहुतांश गर्दुल्ले बसतात. त्यामुळे महामार्ग व्यवस्थापनाने येथे सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.  

 हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman killed in vehicle accident on flyover nashik marathi news