"पैसे परत न केल्यास निवस्त्र करून मारीन"...सावकार पीडितेला म्हणाला..

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

तिच्या पतीने संशयित संतोष तारगे याच्याकडून व्याजाने सात लाख 25 हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी 17 लाख रुपये तारगेला दिले. तरीही, तिघांनी संगनमताने पीडितेच्या पतीस वारंवार मोबाईलवरून शिवीगाळ व ठार करण्याची धमकी दिली. तारगे याने घरात घुसून पीडितेच्या सासू व सासऱ्यांना मारहाण, शिवीगाळ केली.

नाशिक : पंचवटी परिसरातील संशयित सावकाराने, व्याजाने दिलेले 11 लाख रुपये न दिल्यास नागडा करून मारीन, असे पीडिताला धमकावत, त्याच्या पत्नीचाही विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, संतोष तारगे (रा. हिरावाडी, पंचवटी) यास अटक केली. तारगे व त्याची आई फरारी आहेत.

घरात घुसून मारहाण, शिवीगाळ

पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीने संशयित संतोष तारगे याच्याकडून व्याजाने सात लाख 25 हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी 17 लाख रुपये तारगेला दिले. तरीही, तिघांनी संगनमताने पीडितेच्या पतीस वारंवार मोबाईलवरून शिवीगाळ व ठार करण्याची धमकी दिली. तारगे याने घरात घुसून पीडितेच्या सासू व सासऱ्यांना मारहाण, शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेचा हात पकडून पिरगाळून, 11 लाख रुपये नाही दिले, तर तुझ्या पतीस गल्लीत नागडा करून मारीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

 हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

दुसरी घटना : फेसबुकवर विनयभंग 
फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून विवाहितेला अश्‍लील छायाचित्र पाठविणाऱ्या संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने विवाहितेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. अश्‍लील छायाचित्र विवाहितेच्या पतीस पाठविण्याची धमकी दिली. व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील छायाचित्र व संदेश महिलेच्या पतीस पाठवून दिले. याप्रकरणी सायबर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. 

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman molest case in nashik marathi crime news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: