बाळंतीण महिला अन् तान्हं बाळ पदरात...शेकडो किलोमीटर अंतर..अन् मग...

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 14 May 2020

महिलेची सोमवारी सुखरूप प्रसूती झाली. मंगळवारी (ता. 12) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिका मिळेल का, याची चौकशी केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हताश झाले. प्रसूती झालेली महिला व बाळाला घेऊन शेकडो किलोमीटर अंतर कापत घर गाठायचे कसे, असा प्रश्‍न त्यांना पडला.

नाशिक / कळवण : महिलेची सोमवारी सुखरूप प्रसूती झाली. मंगळवारी (ता. 12) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिका मिळेल का, याची चौकशी केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हताश झाले. प्रसूती झालेली महिला व बाळाला घेऊन शेकडो किलोमीटर अंतर कापत घर गाठायचे कसे, असा प्रश्‍न त्यांना पडला. पण पुढे आशेचा किरण दिसला अन् मग....

असं घडलं तर....
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेत असलेले कर्मचारी अरविंद वसावे गरोदर पत्नी शकिला विसावे यांच्यासोबत सोमवारी (ता. 11) पुणे-नंदुरबार बसने प्रवास करीत होते. त्यांच्या पत्नीला मनमाडजवळ प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यांनी चालक व वाहकांना बस मनमाड उपजिल्हा रुग्णालयात घेण्यास विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने बस रुग्णालयात नेऊन महिलेस प्रसूतीसाठी दाखल केले व बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. महिलेची सोमवारी सुखरूप प्रसूती झाली. मंगळवारी (ता. 12) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिका मिळेल का, याची चौकशी केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हताश झाले. प्रसूती झालेली महिला व बाळाला घेऊन शेकडो किलोमीटर अंतर कापत घर गाठायचे कसे, असा प्रश्‍न त्यांना पडला. त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या लतिका राजपूत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आदिवासी विकास विभाग तळोदा व नंदुरबार प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करून रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली. त्यानुसार तळोदा, नंदुरबार प्रकल्प अधिकाऱ्यांनी नाशिकचे आदिवासी अप्पर आयुक्त पी. एन. पाटील यांच्याशी संपर्क करून मदत घेतली.

रुग्णवाहिकेतून त्या कुटुंबाला त्यांच्या मूळ गावी पोहचवले

आयुक्त पाटील यांनी कळवणचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पंकज बुरकुले यांना अटल आरोग्य वाहिनी योजनेंतर्गत कनाशी येथील रुग्णवाहिका मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यास सांगितले. त्यानुसार रुग्णवाहिकेतून त्या कुटुंबाला त्यांच्या मूळ गावी देवमोगरा (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) पोचविण्यात आले. यासाठी प्रकल्प अधिकारी पंकज आशिया, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पंकज बुरकुले, जोपुळे, डॉ. सौ. हिरे, रुग्णवाहिकाचालक विलास गवळी यांचे सहकार्य लाभले. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बाळंतीण महिला सुखरूप मूळ गावी  

मी महानगर परिवहन सेवेत असल्याने अत्यावश्‍यक सेवा म्हणून केव्हाही नोकरीवर जावे लागत होते. पत्नी गरोदर असल्याने तिची काळजी घेण्यास घरी कोणी नसल्याने त्यांना गावी सोडणे महत्त्वाचे होते म्हणून पत्नी शकिला, मुलगी आकांशासमवेत बसने गावी चाललो होतो. अचानक प्रसूती वेदना जाणवल्याने पत्नीला मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रसूतीनंतर घरी जाण्यासाठी आदिवासी विकास विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. यासाठी नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी, नर्मदा बचाव आंदोलनकर्त्या लतिका राजपूत, जुन्नर तालुक्‍यातील सरपंच सोमनाथ माळी, कळवण सहाय्यक प्रकल्प अधिकारी पंकज बुरकुले, नंदुरबार प्रकल्प अधिकारी राहुल इथे यांचे सहकार्य लाभले. - अरविंद विसावे, पुणे  

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman with news born baby safely reached in her native village nashik marathi news