घरकुल योजनेच्या अनुदानासाठी लाच घेताना पकडले रंगेहाथ; महिला सरपंचावर गुन्हा दाखल

विनोद बेदरकर
Wednesday, 14 October 2020

महिला सरपंच अलका गांगोडे यांना घरकूल योजनेच्या अनुदानासाठी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. 14) रोजी अटक केली. अनुदानाच्या रकमेसाठी चकरा मारणाऱ्या व्यक्तीकडून मागितली लाच. वाचा काय घडले?

नाशिक : दरी (ता. नाशिक) येथील महिला सरपंच अलका गांगोडे यांना घरकूल योजनेच्या अनुदानासाठी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. 14) रोजी अटक केली. अनुदानाच्या रकमेसाठी चकरा मारणाऱ्या व्यक्तीकडून मागितली लाच. वाचा काय घडले?

सापळा रचून पकडले रंगेहाथ

दरी गावातील एकाच्या वडिलांना घरकुल योजनेत घरासाठी अनुदानाचे १५ हजार रुपये मिळाले. मात्र त्याचदरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अनुदानाची राहिलेली रक्कम आईच्या खात्यात जमा करण्याची मागणी होती. घराच्या राहिलेल्या अनुदानाच्या रकमेसाठी तो ग्रामपंचायत कार्यालयात चकरा मारीत असताना सरपंचांनी त्यापोटी पाच हजारांची लाच मागितली. मंगळवारी (ता. १३) लाच मागितल्यानंतर बुधवारी (ता. १४) लाच देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साफळा रचून सरपंच गांगोडे यांना लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंकज पळशीकर, मोनिका थॉमस, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Sarpanch arrested for taking bribe nashik marathi news