नाशिकमध्ये तीनशे फुट दरीत आढळला महिलेचा मृतदेह; रेस्क्यू टिमच्या ११ तासांचा प्रयत्नांना यश 

प्रशांत कोतकर
Wednesday, 17 February 2021

इगतपुरी-मायंदरी येथील दरीत नऊ दिवसांपासून असलेला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह नाशिक रेस्क्यू टीम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व शहापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने ११ तासांच्या प्रयत्नांनंतर गुरुवारी (ता. १७) बाहेर काढला. 

नाशिक : इगतपुरी-मायंदरी येथील दरीत नऊ दिवसांपासून असलेला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह नाशिक रेस्क्यू टीम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व शहापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने ११ तासांच्या प्रयत्नांनंतर गुरुवारी (ता. १७) बाहेर काढला. 

तीनशे फुट दरीत आढळला मृतदेह

नाशिक रेस्क्यू टीमला मंगळवारी (ता. १६) रात्री इगतपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांनी माहिती दिली.नाशिक रेस्क्यू टीमचे दयानंद कोळी, संतोष जगताप, सुमीत पंडित, ओम उगले, संकेत क्षीरसागर, भीमा शंकर सहाने, नीलेश पवार, मानस लोहकरे, गौरव रहाणे, सागर जोशी (नाशिक), विशाल माळगावकर (पनवेल), मनोज कनोजिया (नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन) व श्‍याम धुमाळ (शहापूर आपत्ती व्यवस्थापन) आदी बुधवारी सकाळी सहाला घाटनदेवी (ता. इगतपुरी) येथे एकत्र येत मायंदरीकडे गेले.  संपूर्ण कातळ असलेल्या दरीत आर्टिफिशल अँकर करण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यापद्धतीचे अँकर करण्यात आले. वरचा बेस संतोष जगताप यांनी सांभाळत इतर सदस्यांनी संवादकाची भूमिका व अन्य महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. सुमीत, ओम व विशाल हे तिघे साहित्यासह दरीत उतरले. साधारण तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

नाशिक रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश

त्यात महिलेचे पाय दोन विशाल दगडांच्या आत अडकलेले होते. तिघांनी अथक प्रयत्नांनंतर दगड बाजूला करीत मृतदेह प्लॉस्टिकमध्ये गुंडाळत पुलिंग केला. तब्बल ११ तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह वरती आणण्यात पथकाला यश आले. विच्छदेनासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मानवेढे (ता. इगतपुरी) येथील मीता अशोक वीर असे मृत महिलेचे नाव असून, ती तब्बल दहा दिवसांपासून दरीत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. स्थानिकांनी दोन दिवस प्रयत्न केले, मात्र यश न आल्याने नाशिक रेस्क्यू टीमला बोलविण्यात आले होते. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womans body was found in a 300 feet valley in Nashik Marathi news