"माजी सभापती वारंवार शरीरसुखाची मागणी करत होते...मग प्रियकराच्या मदतीने केले काम तमाम" संशयित महिलेची जबानी

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 16 मे 2020

संशयित महिला म्हणाली.."तिचे अन् टॅक्सीचालक रवी सुरेश खलाले यांच्याशी सन २०१३ पासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती यांचा गेल्या चार महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क आला. आम्हा दोघांचे मोबाइलवर तासनतास संभाषण व व्हाट्सअप चॅटिंग सुरू झाले. याचकाळात ते माझ्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करून मानसिक त्रास देत होते. ही गोष्ट मी रवीला सांगितली. त्यानंतर"...

नाशिक / सटाणा : सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती आणि सम्राट म्युझिकल्सचे संचालक राजेंद्र सरदार यांच्या निर्घूण खून प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावण्यास सटाणा पोलिसांना मोठे यश आले आहे. या खून प्रकरणी शहरात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला आता पूर्णविराम जरी मिळाला असला तरी संशयित आरोपी महिलेने तिच्या जबानीत धक्कादायक माहिती दिली आहे.

ते सारखे शरीरसुखाची मागणी करायचे - संशयित महिला
संशयित हर्षदा सोनवणे हिने पोलिस चौकशीत दिलेल्या जबानीनुसार तिचे टॅक्सीचालक रवी सुरेश खलाले यांच्याशी सन २०१३ पासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, (कै.) राजेंद्र सरदार यांचा गेल्या चार महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क आला. आम्हा दोघांचे मोबाइलवर तासनतास संभाषण व व्हाट्सअप चॅटिंग सुरू झाले. याचकाळात (कै.) सरदार हे माझ्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करून मानसिक त्रास देत होते. ही गोष्ट मी रवीला सांगितली. त्यानुसार बुधवार (ता.१३ मे) रोजी रात्री राजेंद्र सरदार यांना संपविण्याचा कट आखला. त्यानुसार माझ्या भाच्याच्या मोबाइलवरुन मी त्याला रात्री साडे दहा वाजता नामपुर रोडवरील बागलाण अॅकेडमी जवळ गाडी घेऊन येण्यास सांगितले. इकडे रवीला सुद्धा याच ठिकाणी येण्यास सांगितले. तो त्याच्या मोटरसायकलने तेथे आला. दरम्यान मी राजुला आपण पुढे निर्जनस्थळी जाऊ असे सांगून त्यांच्या टाटा मांझा कारमध्ये बसून निघाली. कारच्या मागे रवी मोटारसायकलने येत होता. कोळीपाडा जवळ रस्त्याचे काम चालू असल्याने गाडी थांबली. याचवेळी रवी मागून आला. राजेंद्रने गाडी खाली उतरून मागून येत असलेल्या रवीला हा रास्ता बंद आहे का, असे विचारले असता, रवीने मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले व आपल्या पाठीमागे लपवलेल्या कटणी या लोखंडी हत्याराने राजेंद्रच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने राजेंद्र सरदार रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याला तसेच त्याच्या गाडीत बसवून रवीने टाटा मांझा कार तर हर्षदाने स्वत: रवीची मोटारसायकल चालवित दोधेश्वर घाटात आले. तेथे आम्ही राजेंद्रचा मृतदेह असलेली कार न्यूट्रल करून तिला घाटात ढकलून दिले आणि मोटारसायकलने परतीच्या मार्गाने आमच्या घरी पोहोचलो.

हेही वाचा > राजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले ! प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा

पोलीसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली.

पत्रकार परिषदेत पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले, की गुरुवारी (ता. 14) सकाळी सातला तीर्थक्षेत्र श्री दोधेश्‍वर येथील घाट रस्त्यावर राजेंद्र सरदार यांचा त्यांच्याच गाडीत खून झाल्याचे त्यांच्या डोक्‍यावरील गंभीर जखमांना पाहून निश्‍चित झाले होते. त्या दिशेने तपसाची चक्रे फिरवली. चौकशीत हर्षदाने प्रियकर टॅक्‍सीचालक रवी सुरेश खलाले (वय 36) याच्यासोबत राजेंद्र सरदार यांचा खून केल्याचे कबुल केले. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman,s statementa about mystery solved of rajendra sardar murder case nashik crime marathi news