esakal | ''मालेगाव पॅटर्न निर्माण करण्यात युनानी डॉक्टरांचे काम कौतुकास्पद''
sakal

बोलून बातमी शोधा

abdul-sattardff.jpg

अहोरात्र मेहनत घेऊन सर्वांत मोठ्या सामाजिक संकटाला परतवून मालेगाव पॅटर्न निर्माण करण्यात प्रशासनासह युनानी डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच मालेगाव काढ्यानेही रुग्णांना दिलासा देऊन रुग्णांचे मानसिक स्थैर्य अबाधित राखण्यात मोठा हातभार लावला.

''मालेगाव पॅटर्न निर्माण करण्यात युनानी डॉक्टरांचे काम कौतुकास्पद''

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात युनानी डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने कोविडयोद्धांची भूमिका बजावली आहे. संकट काळात प्रशासनासोबत उभे राहून मन्सुराच्या सर्व टिमने चांगला आदर्श घालून दिल्याचे प्रतिपादन महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी (ता. ८) येथे केले. 

४०० युनानी डॉक्टरांच्या टिमचे प्रशासनासोबत काम 

मालेगावातील मन्सुरा कॅम्पसमध्ये कोविडयोद्ध्यांच्या गौरवप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार आसिफ शेख, डॉ. अर्शाद मुखतार, तहसीलदार चंद्रजित राजपूत, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, प्रदीप बच्छाव, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आदींसह कोविडयोद्धे व वैद्यकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सत्तार म्हणाले, की कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सुमारे ४०० युनानी डॉक्टरांच्या टिमने प्रशासनासोबत काम केले. त्यामुळे मालेगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

नागरिकांनी गाफील राहता कामा नये...

अहोरात्र मेहनत घेऊन सर्वांत मोठ्या सामाजिक संकटाला परतवून मालेगाव पॅटर्न निर्माण करण्यात प्रशासनासह युनानी डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच मालेगाव काढ्यानेही रुग्णांना दिलासा देऊन रुग्णांचे मानसिक स्थैर्य अबाधित राखण्यात मोठा हातभार लावला. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. येणारे सण, उत्सव साजरे करताना नागरिकांनी गाफील राहता कामा नये. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.  

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

go to top