World Ozone Protection Day : वेळीच सावध न झाल्यास सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम; वाचा सविस्तर

प्रशांत बैरागी
Wednesday, 16 September 2020

संरक्षणात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती मोहीम हाती घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने १६ सप्टेंबर १९८७ मध्ये क्‍लोरोफ्युरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्याचा करार केला. त्यानिमित्ताने १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.  

नाशिक : (नामपूर) ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण जग बेजार झाले आहे. यामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, रोगट तापमान, त्वचेचे गंभीर विकार यांसारख्या समस्यांची झळ थेट ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

ही यंदाची जागतिक ओझोन दिनाची थीम

पर्यावरणातील ओझोन वायूचा सातत्याने कमी होणारा थर हे याचे प्रमुख कारण असल्याचे वैज्ञानिकांच्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे बुधवारी (ता. १६) जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या ओझोन दिनानिमित्त नागरिकांनी पर्यावरणपूरक सेवांना अग्रक्रम देणे काळाची गरज बनली आहे. 'आयुष्यासाठी ओझोन' ही यंदाच्या जागतिक ओझोन दिनाची थीम आहे. जगभरातील सामान्य जनतेला पर्यावरणाच्या दृष्टीने ओझोन थराचे महत्त्व समजण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे दर वर्षी जगभरात ओझोनदिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ओझोन थराचे संरक्षण, शाश्‍वत ऊर्जा, प्रदूषणावर नियंत्रण याविषयी जागृती करण्यात येत आहे. 

अन् विषयाचे गांभीर्य जगाच्या समोर

वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, कमी होत जाणारी जंगले, बदललेले राहणीमान ही वातावरण प्रदूषणाची महत्त्वाची कारणे आहेत. पृथ्वीभोवतीचे नैसर्गिक ओझोनचे कवच सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून सजीवांचे संरक्षण करते. मात्र, घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोनचा थर कमकुवत होत आहे. अतिनील किरणांमुळे जागतिक तापमानात बदल होत आहे. बदलत्या हवामानामुळे विविध देशांतील पावसाचे तसेच उन्हाळ्याचे चित्र बदलले आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादन आणि जनावरांच्या व्यवस्थापनावर दिसून येत आहे. १९८५ मध्ये अंटार्क्‍टिकावरील ओझोनचा थर विरळ झाल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले आणि या विषयाचे गांभीर्य जगाच्या समोर आले. 

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

१९८७ मध्ये करार

याची शास्त्रीय कारणे शोधून हानिकारक वायूंचा वापर आणि उत्सर्जन थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८७ मध्ये करार केला. त्याद्वारे युवा पिढी व नागरिकांना ओझोनच्या थराचे महत्त्व पटण्यासाठी आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती मोहीम हाती घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने १६ सप्टेंबर १९८७ मध्ये क्‍लोरोफ्युरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्याचा करार केला. त्यानिमित्ताने १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.  

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Ozone Protection Day, Ozone for Life is this year's theme nashik marathi news