पावणेदोनशे वर्षांत प्रथमच 'नाथां'ची पालखी वाहनातून...विश्‍वस्तांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाउनच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी आषाढीवारी वारकरी संप्रदायाचे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांसह राज्यातील प्रमुख मानाच्या चार पालख्यांनी त्यांची भूमिका घेत वाहनातून साध्या पद्धतीने वारी करण्याचा निर्णय घेत तशी परवानगी मागितली आहे. 

नाशिक : पावणेदोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि राज्यातील प्रमुख मानाच्या आठ पालख्यांत समावेश असलेली त्र्यंबकेश्‍वर येथील श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची वारी यंदा प्रथमच साध्या पद्धतीने निघणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन परवानगी मागितली आहे. 

वारीला खंड नको म्हणून हा निर्णय

लॉकडाउनच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी आषाढीवारी वारकरी संप्रदायाचे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांसह राज्यातील प्रमुख मानाच्या चार पालख्यांनी त्यांची भूमिका घेत वाहनातून साध्या पद्धतीने वारी करण्याचा निर्णय घेत तशी परवानगी मागितली आहे. संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या विश्‍वस्तांची त्र्यंबकेश्‍वरला बैठक होऊन त्यात, यंदा लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीतील संसर्ग टाळून मानकरी, वारकरी आणि आठ- दहा विश्‍वस्त अशा वीस ते तीस जणांनी वारीत खंड पडू नये, यासाठी दशमीला वाहनातून पंढरपूरला जायचे. तेथे एकादशीची महत्त्वाची प्रदक्षिणा व इतर नियमित पूजाविधी करायचे द्वादशीला उपवास सोडून माघारी फिरायचे, असा निर्णय झाला. 

प्रथमच खंड 

त्र्यंबकेश्‍वर येथील नाथांच्या वारीला पावणेदोनशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. राज्यातील मानाच्या आठ पालख्यांत नाथांच्या पालखीचा 
समावेश होतो. साधारण 26 दिवस या पालखीचा प्रवास असतो. त्र्यंबकेश्‍वरहून निघून नाशिक, नगर, सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतून ऊन, 
वारा पावसात पालखी निघते. अलीकडे काही वर्षांत पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र यंदा प्रथमच वाहनातून वारी 
सोपस्कार करावा लागत आहे. 

हेही वाचा > स्वच्छ भारत अभियानात नाशिकचे तारे जमीनवरच! 'या' कारणांमुळे रेटिंग पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष

सोमवारी बैठक होऊन त्यात वारीला खंड पडू न देण्यासाठी आठ-दहा विश्‍वस्त, मानकरी, वारकरी यांनी एकत्रित वाहनातून जाऊन वारी पूर्ण करायची, असा निर्णय झाला. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन परवानगी मागितली आहे. - पवन भुतडा (अध्यक्ष, निवृत्तिनाथ देवस्थान संस्थान) 

पालखीची दीर्घ परंपरा आहे. राज्यातील चार प्रमुख मानाच्या पालख्यांच्या त्यांच्या त्यांच्या विश्‍वस्तांच्या बैठका होऊन यंदा वाहनातून वारी करण्याचे प्राथमिक स्वरूपाचे निर्णय झाले आहे. शासनाच्या आदेश व नियमानुसार निर्णय होणार आहे. - पुंडलिक थेटे (पालखीप्रमुख, निवृत्तिनाथ महाराज पालखी)

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year, it has been decided to take Saint Nivruttinath's palanquin in a vehicle nashik marathi news