Friendship Day 2020 : कोरोनामुळे यंदाचा फ्रेंडशिप डे व्‍हर्च्युअली...तरुणाईचा हिरमोड

अरुण मलाणी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

'तेरी मेरी यारी' म्हणत तरुणाईकडून ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या जल्‍लोषात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्‍या प्रभावामुळे भेटीगाठींवर मर्यादा आल्‍याने अपेक्षित जल्‍लोषापासून मुकलेल्‍या तरुणाईचा हिरमोड झाला आहे.

नाशिक : 'तेरी मेरी यारी' म्हणत तरुणाईकडून ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या जल्‍लोषात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्‍या प्रभावामुळे भेटीगाठींवर मर्यादा आल्‍याने अपेक्षित जल्‍लोषापासून मुकलेल्‍या तरुणाईचा हिरमोड झाला आहे. बहुतांश युवकांनी यंदाचा फ्रेंडशिप डे व्‍हर्च्युअली साजरा करण्याचे नियोजन आखले आहे. काही जीवलग
मित्रांनी आपापल्‍या घरांत भेटी घेण्याचे नियोजन केले आहे. 

जल्‍लोषापासून मुकल्‍याने तरुणाईचा हिरमोड 

फ्रेंडशिप डेच्‍या पंधरा दिवस आधीपासून बाजारपेठांमध्ये आकर्षक फ्रेंडशिप बँडपासून ते आकर्षक भेटवस्‍तू दाखल होता. शेवटच्‍या दिवसापर्यंत युवकांकडून खरेदीचा उत्‍साह बघायला मिळतो. परंतु यंदा दुकानांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे. लहान असो वा ज्येष्ठ नागरिक असो आपापल्या वयानुसार प्रत्येकाचे मित्र-मैत्रिणी असतात आणि त्यांच्यात वेगळात भावबंध असतो. निसर्गरम्य ठिकाणी अथवा हॉटेलमध्ये तरुणाईकडून आउटिंग, हॉटेलिंग करताना सेलिब्रेशनचे नियोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे या सर्व गोष्टींवर बंधने असल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. त्याचमुळे फ्रेंडशिप डेसाठी असलेल्या विविध भेटवस्तू, बँड, चॉकलेट खरेदीवरही कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा केवळ वीस टक्केच व्यवसाय झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

शाळा, महाविद्यालय बंदमुळे परिणाम 

कोरोनाच्या प्रादुभामुळे मार्चपासून शाळा, महाविद्यालयेदेखील बंदच आहे. याचाही फ्रेंडशिप डेच्या सेलिब्रेशनवरही परिणाम होणार आहे. रविवारची सुटी असल्‍याने शाळा, महाविद्यालयांमध्ये सोमवारी उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळाले असते. परंतु यंदा शैक्षणिक कॅम्‍पस सुनेसुने राहणार आहेत.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year's Friendship Day is virtually celebrated due to the influence of Corona nashik marathi news