धक्कादायक! येवल्यात नव्याने आढळणारे कोरोना रुग्ण डॉक्टर व परिचारिकेशी संबंधित?..आरोग्य विभाग संकटाच्या भोवऱ्यात!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

मालेगाव कनेक्शनमुळे मुस्लिम बहुल भागातच रुग्णसंख्या वाढण्याची भीती असताना त्या भागातील संपर्क साखळी तुटली असून नव्याने रुग्ण आढळलेला नाही.हा दिलासा मानला जात असतांना नव्याने जे रुग्ण आढळतात ते सर्व आरोग्य विभागाचे डॉक्टर व परिचारिकेची संबंधित असल्याने आरोग्य विभाग इतका निष्काळजी कसा होऊ शकतो असा सवाल यानिमित्ताने शहराला पडला आहे.

नाशिक / येवला : गेल्या दोन दिवसात ६८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळालेल्या येवलेकरांना आज पुन्हा मोठा झटका बसला. एकाच वेळी तब्बल सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा येवलेकर हादरले असून यामध्ये आरोग्य विभागाची संबंधितच सर्वजण असल्याने संताप व्यक्त होत आहे.आता एकूण बधितांची संख्या ३१ झाली आहे.

येवल्यात पुन्हा ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या ३१वर
मालेगाव कनेक्शनमुळे मुस्लिम बहुल भागातच रुग्णसंख्या वाढण्याची भीती असताना त्या भागातील संपर्क साखळी तुटली असून नव्याने रुग्ण आढळलेला नाही.हा दिलासा मानला जात असतांना नव्याने जे रुग्ण आढळतात ते सर्व आरोग्य विभागाचे डॉक्टर व परिचारिकेची संबंधित असल्याने आरोग्य विभाग इतका निष्काळजी कसा होऊ शकतो असा सवाल यानिमित्ताने शहराला पडला आहे.

पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण
शनिवारी ६८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.बधितांची संख्या न वाढल्याने कोरोनापासून शहर आणि तालुकावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा एका दिवसापूरताच राहिला. एकूण १७५ रुग्णांचे अहवाल शनिवारपर्यंत निगेटिव्ह आल्याने कोरोनाबधितांची संख्या २५ वरच स्थिर राहिली होती.आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये पाटोदा येथील २ रुग्णांचा समावेश असून हे रुग्ण पाटोदयात जो रुग्ण प्रथम कोरोनाबधित निघाला ,त्याच्या घराशेजारील असून या रुग्णाच्या संपर्कात हे दोघे जण आल्याचे समजते. शहरातील बदापुर रस्त्यावरील ओम साईराम कॉलनीतील एकाच कुटुंबातील तिघे जण बाधित आले असून या कुटुंबातील परिचारिका ही नगरसुल प्राथमिक उपकेंद्रात सेवेवर आहे.पारिचरिकेच्या घरातील तिघे जण बाधित निघाल्याने पुन्हा आरोग्य विभाग संकटाच्या भोवऱ्यात आला आहे.

हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

गंगादरवाजा भागातील पॉझिटिव्ह आलेल्या महीला रुग्ण ही शहरातील ग्रामीण रुग्णालयातील पॉझिटिव्ह निघालेल्या टेक्निशियनची आई असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. येवला शहरासह पाटोदयातही रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण तयार झाले असून संपर्क साखळी तूटावी अशी आस सर्वांना लागली आहे.

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Yeola, the number of patients increased to 31 as the reports of 6 persons came back positive