
नाशिक : (येवला) कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येमुळे हॉटस्पाट बनलेले येवला शहर आता नियंत्रणात आले असून येथील बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्यावर पोचली आहे. विविध आजारांची हिस्ट्री असलेलेच रुग्ण मृत्यू पावले असून मृत्यूचे प्रमाण साडेसात टक्के आहे.
आजारांची हिस्ट्री असलेल्यानाचाच आतापर्यंत मृत्यू
मालेगाव कनेक्शनमुळे येवल्यात पहिला रुग्ण सापडल्यावर पहिल्या टप्प्यात बाधितांची ३१ वर संख्या गेली अन महिन्याच्या आत शून्यावर आल्याने पैठणीचे गाव कोरोनामुक्त झाले होते. मात्र मे मध्ये सुरु दुसरा टप्पा येवलेकरांच्या जिवावर बेतणारा ठरला. यादरम्यान नगरसुलला कोविड केअर सेंटर हलवले पण तेथे जागा नसल्याने पुन्हा बाभूळगाव येथेही उपचार सुरु झाले. दोन्ही ठिकाणी येथील आरोग्य विभागाच्या टीमने रुग्णांची पुरेपूर काळजी घेत उपचार केला, मानसिक आधारही दिला. विविध प्रयत्नांमुळेच २२ जण उपचार घेत असून तेही सुखरूप घरी परतणार आहे.
आरोग्य तपासणीसाठी शिक्षकांचे सहकार्य मोलाचे...
येवल्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, प्रशासनातील सर्व अधिकारी यांचे योगदान मोलाचे ठरले. या सर्वांनीच आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना नागरिकांना धीर अन प्रसंगी दमही दिला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील आढावा बैठका घेत सूचना दिल्या. यासह उपाययोजनात नगरपालिक, आरोग्य तपासणीसाठी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
इतर आजार ठरले मृत्यूस कारणीभूत
येवल्यात आत्तापर्यंत १५ जण कोरोणाचे बळी ठरले असून हे सर्वच नाशिक येथे खाजगी व जिल्हा रुग्णालयात मृत झाले आहेत. यातील एक दोघे सोडले तर उर्वरित सर्वच पन्नाशी पार केलेले अन दमा, उच्च रक्तदाब, मधुमेह, शुगर, श्वसन आदी आजारांच्या संदर्भात असलेले रुग्ण होते. बाभूळगाव व नगरसूलला उपचार घेणारे सर्वच बरे होऊन घरी गेले.
रुग्ण आढळलेली गावे
येवला, अंगणगाव, पाटोदा, गवंडगाव,
सावरगाव, मुखेड, साताळी, अंदरसुल,
राजापूर, पिंपळखुटे, रेगाव, आडसुरेगाव,
मातुलठाण, सोमठाणदेश, नागडे, नेऊरगाव
कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यावर
आत्तापर्यंतचे कंटेनमेंट झोन : ५०
सर्वेक्षणासाठी कार्यरत कर्मचारी : ५६५
सर्वेक्षण केलेली घरे : १७३१४
सर्वेत तपासलेले नागरिक : ८२६८३
आतापर्यंतचे पॉझिटिव्ह : २०३
एकूण मृत्यू : १५
पूर्णपणे बरे झालेले : १६६
आज उपचार घेणारे : २२
घेतलेले एकूण स्वॅब : ५८३
एकूण आलेले निगेटिव्ह : ४१६
आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर,परिचारिका व टीमने अहोरात्र घेतलेल्या रुग्णांच्या काळजीचे व मेहनतीचे हे यश आहे. रुग्ण बरे होत आहे मात्र नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. - डॉ.हितेंद्र गायकवाड,तालुका वैद्यकीय अधिकारी
माझ्यासह संपूर्ण नगरपालिका शहरात, बाभूळगावच्या सेंटरवर कोरोणाच्या आपत्ती नियंत्रणासाठी कार्यरत आहे. वेळेचे बंधन, सम-विषम फार्मूला, स्वच्छता, दंडात्मक कारवाई, फवारणी या सर्व प्रक्रियेत नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी पूर्णवेळ सहभागी आहे. - संगीता नांदूरकर, मुख्याधिकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.