"‘नीट’मध्ये प्रथम तर आले, पण माझ्या डॉक्टरच्या स्वप्नाचे काय?" गरीब कुटुंबातील मयुरीने उराशी बाळगलेले एक स्वप्न

mayuri neet.jpg
mayuri neet.jpg

एरंडगाव (जि.नाशिक) : जिद्द, चिकाटी असेल, तर उराशी बाळगलेले स्वप्न नक्कीच साकार होते, येथील मयूरी गोराडे हिने नुकत्याच झालेल्या ‘नीट’ परीक्षेत ५२९ गुण मिळवत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला गवसणी घातली. पण मयूरीला मात्र डॉक्टर व्हायचंय. वडिलांच्या व्यवसायावर कुटुंब चालविणेही दुरापास्त, तर डॉक्टर कसे होणार? असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

मयूरीला मात्र डॉक्टर व्हायचंय..स्वप्नाला गवसणीसाठी पाठबळाची गरज
हुशार मयूरीने दहावीत ९७, तर बारावीला ८४.७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तिची घरची परिस्थिती हलाखीची आहे. खेडेगावात वडिलांचा पत्र्याच्या टपरीमध्ये टेलरिंग व्यवसाय असून मयूरीची आई या व्यवसायाला हातभार लावते. दोन वर्षांपूर्वी दुकान आगीत खाक झाले होते. मोठी बहीण स्वकष्टाने तसेच वडिलांच्या साथीने बी. एस्सी. ॲग्री करत आहे. पण लहान बहीण मयूरीला मात्र डॉक्टर व्हायचंय. वडिलांच्या व्यवसायावर कुटुंब चालविणेही दुरापास्त, तर डॉक्टर कसे होणार? असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. यामुळे मयूरीचे वडील बाळासाहेब मुलीच्या स्वप्नाला तडा जाऊ नये म्हणून मदतीसाठी धडपडत आहेत. समाजातील कुणीतरी दानशूर मदतीला धावून येईल, मुलीच्या डॉक्टरकीच्या स्वप्नाला उभारी देईल, अशी आशा ते करताहेत. 

शिक्षकांची व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे मदत
मयूरीला आपली मुलगी मानून दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावला, तर तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न नक्कीच साकार होईल, असे आवाहन प्राथमिक शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांनी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे केले होते. त्यानुसार येवला तालुक्यातील शिक्षकांनी ५१ हजारांची भरघोस मदत केली आहे. पुढील शिक्षणासाठी मदतीची रक्कम विजयादशमीला मयूरीकडे सुपूर्द करण्यात आली. पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनीही आर्थिक मदत केली.

विठ्ठल आठशेरे, लता कुऱ्हाडे, जालिंदर सोनवणे, राजेंद्र ठोंबरे, बाजीराव सोनवणे, पंकज गायकवाड, संजय माहुलकर, गोपाळ तिदार, किरण जाधव, योगेश देशमुख, अनिल महाजन, विठ्ठल पैठणकर, महेश पवार, एकनाथ घुले, प्रकाश साळुंके, सोमनाथ सोनवणे, प्रमोद पाटील, मिलिंद गुंजाळ, विजय दुकळे, अश्विनी पगारे, नरेंद्र पाटील, जयश्री राठोड, अश्विनी जगदाळे, रेखा बाविस्कर, शालिनी जाधव, अजय शिंपी, किरण कापसे, प्रमोद शिंदे, प्रशांत बागूल, संदीप जाधव, रमेश उगले, दत्ता भोरकडे, माधव पिंगळे आदी उपस्थित होते. 

संपादन - ज्योती देवरे
.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com