
नाशिक : (येवला) पावसाळा संपत आल्याने पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्याचे पाणी तालुक्यात येण्यासाठी येवल्यासह चांदवडकर प्रतीक्षा करत आहेत. मांजरपाडा क्षेत्रात जोरदार पाऊस पडण्याचीही आस लागली असून, तिकडे नजरा खिळल्या आहेत. आता पाणी दरसवाडी धरणाकडे वाहत असून, पुढील तीन दिवसांत दरसवाडीत पोचण्याची अपेक्षा आहे.
पुणेगावच्या पुढे ४५ किमीवर पाणी
मागील वर्षी सुरवातीला जोरदार पाऊस झाल्याने ४७ वर्षांनंतर पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालवा प्रवाहित झाला होता. यामुळे बाळापूरपर्यंत (१०३ किलोमीटर) पाणी पोचले होते. पाणी येणारच नाही, अशी लोकांची मनाची तयारी होत असताना पालकमंत्री छगन भुजबळ यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प मांजरपाडा पूर्ण झाला आणि पहिल्याच प्रयत्नात पाणी बाळापूर (ता. येवला)पर्यंत आले. तिसऱ्या पिढीला या कालव्याला हे पाणी पहायला मिळाले. त्यामुळे हा कालवा नियमित प्रवाही होणार, हे निश्चित झाले होते. यंदा दुर्दैवाने मांजरपाडा लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्याने पाणी येते की नाही, अशी शंका वाटत होती.
दरसवाडीत पोचण्यासाठी तीन दिवसांची प्रतीक्षा
भुजबळांच्या आदेशानुसार १ सप्टेंबरला पुणेगावमधून दरसवाडीसाठी पाणी सोडले असून, येत्या तीन ते चार दिवसांत हे पाणी दरसवाडीला पोचणार आहे. या पाण्याने दरसवाडी तुडुंब होताच येवल्यासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील वर्षी पाणी ४० किमी म्हणजे बाळापूरपर्यंत आले होते. पाणी डोंगरगावपर्यंत पोचविणे हे या कालव्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अनकुटे येथील रेल्वे क्राँसिंगचे काम अपूर्ण असल्याने पाणी अनकुटे रेल्वे क्राँसिंगपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. दरम्यान शनिवारी (ता. ५) विखरणीचे शेतकऱ्यांनी पुणेगाव धरणावर जाऊन पाण्याची पाहणी केली व आनंदोत्सव साजरा केला.
मांजरपाडा प्रकल्पाचे काम अपूर्ण असताना मागील वर्षी पाणी बाळापूरपर्यंत आले होते. याच वर्षी पाणी डोंगरगावपर्यंत पोचविणे, हे पालकमंत्री श्री. भुजबळ यांचे उद्दिष्ट होते. मात्र, लॉकडॉउनमुळे मांजरपाडाचे सुरू झालेले काम बंद पडले. रेल्वे क्राँसिंग काम अर्धवट राहिले. लॉकडॉउन शिथिल होताच कालवा सफाई, लीकेज, दगड काढने ही शक्य असलेली कामे भुजबळ यांचे आदेशानुसार पूर्ण झाली आहेत. यंदा पाणी निश्चित अणकुटेपर्यंत पोचेल.
- मोहन शेलार, आंदोलक विखरणी
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.