कोरोनाची भिती..नैराश्य की आणखी काही? तरुणाकडून पुन्हा 'धक्कादायक' पाऊल

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच विंचूर येथून जवळच असलेल्या थेटाळे रोडवरील सैलानीनगर, कचरा डेपोसमोर राहत असलेल्या 31 वर्षीय तरुणाने (ता. 22) बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाशिक / विंचूर : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच विंचूर येथून जवळच असलेल्या थेटाळे रोडवरील सैलानीनगर, कचरा डेपोसमोर राहत असलेला अशोक शांताराम गुजर (वय 31) याने (ता. 22) बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून समजले नाही. या घटनेमुळे परिसरात नातेवाईकांमध्ये चिंतेचे तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात तरुणाईकडून घडतोय प्रकार

नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने (ता.११) एप्रिलला आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली होती. ३ ते ४ दिवसांपूर्वी (ता.२१) एप्रिलला लॉकडाउनमुळे पोटाची भ्रांत, कायदेशीर परवानगीसाठी केलेला अर्जही बेदखल, आता काय करायचे, या नैराश्‍यातून जळगाव जिल्ह्यातील रहिवासी व एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने नाशिकमध्ये, तर काळजी घेऊनही "कोरोना' झाल्याच्या संशयातून आजीच्या दशक्रिया विधीच्या अगोदर तरुणाने (वय 31) आत्महत्या केल्याची घटना सिन्नर तालुक्‍यात घडली होती.

हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​

पोलीस करताएत अधिक तपास

विंचूर येथील आत्महत्येबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड, हवालदार राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर तपास करीत आहेत.  

हेही वाचा > VIDEO : "सावरा..पोलीसांवर धावून गेलात..तर त्याची गय केली जाणार नाही" 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide at Vinchur nashik marathi news