सिन्नर-नाशिक महामार्गावर कारला भीषण अपघात; तरुण जागीच ठार

अजित देसाई 
Friday, 26 February 2021

सिन्नर - नाशिक महामार्गावर चिंचोली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पुलावर पुढे चालणाऱ्या कंटेनरखाली कार शिरल्याने अपघात झाला.

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर - नाशिक महामार्गावर चिंचोली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पुलावर पुढे चालणाऱ्या कंटेनरखाली कार शिरल्याने झालेल्या अपघातात सिन्नर येथील सराफी व्यावसायिक तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

शुभमच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ

शुभम राजेंद्र कपोते (वय २४) हा तरुण कारमधून (क्र. एमएच - १५ - जीए - ४१४१) नाशिककडे जात असताना हा अपघात झाला. सिन्नरच्या माजी उपनगराध्यक्ष राजश्री कपोते व भाजपचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र कपोते यांचा तो मुलगा आहे. कपोते कुटुंबीय नाशिक येथे स्थायिक झाले असून, व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करतात. सायंकाळी नाशिककडे जात असताना कंटेनरखाली कार गेल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभमच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुभमचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला असून, लग्नाची तारीख देखील ठरली होती. रात्री उशिरा संगमनेर नाका येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

 
हेही वाचा - युवा नेत्याचे अलिशान कारचे स्वप्न भंगले! स्वप्न भंगाच्या सुरस कथेची परिसरात चर्चा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man was killed in a car accident on Sinnar Nashik highway Marathi News