काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर 

काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर 

काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर 

जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन व आर्या फाउंडेशनच्या मदतीने गेल्या दहा दिवसांत काश्‍मिरातील सीमावर्ती भागात शिबिर घेऊन वैद्यकीय सेवा दिली. 
जळगावचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह नाशिक येथील ऋषिकेश परमार, डॉ. विवेक जोशी, डॉ. दिनार सावंत, डॉ. नैना खराडे, डॉ. मंगेश खिल्लारी, डॉ. सुनील जाधव, डॉ. भाग्येश्री बागूल, संगमनेर येथील अमोल कासार, डॉ. शोभना गायकवाड, डॉ. शैलेश गायकवाड, डॉ. सविता कासार यांनी काश्‍मीर खोऱ्यातील कुपवाडा, लढाख सेक्‍टर, द्रुगमुल्ला सेक्‍टर, मच्चील सेक्‍टर, केरन सेक्‍टर, बहत्तरगाम सेक्‍टर, लुनहारे सेक्‍टर, राशनपोरा, क्रॉलपोरा सेक्‍टर या अतिसंवेदनशील भागात वैद्यकीय सेवा दिली. या सेवेत लेफ्टनंट कर्नल आकाश चिंचे, मेजर पुनीत कटारिया, कॅप्टन जसविंदर, कॅप्टन डॉ. संतोष, कॅप्टन रोशन, ब्रिगेडिअर जयंत कर, मेजर चॅटर्जी आदींचे सहकार्य लाभले. 

4,900 जणांनी घेतला लाभ 
सीमावर्ती भागातील आरोग्य शिबिरादरम्यान चार हजार 900 रुग्णांनी लाभ घेतला. या रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली. यासाठी भारतीय सैन्याने औषधींचा साठा उपलब्ध करून दिला. सोबतच डॉक्‍टरांच्या चमूने महाराष्ट्रातून बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे ऋषिकेश परमार यांनी नाशिकहून, तर आर्या फाउंडेशनतर्फे डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सुमारे एक लाख रुपयांची औषधी रुग्णांना वितरित केली. 

डॉ. पाटील यांच्या कार्याची दखल 
द्रुगमुल्ला येथील शिबिरादरम्यान मूळ जळगावचे असलेले लेफ्टनंट जनरल जे. बी. चौधरी यांच्या पत्नी कल्पना चौधरी यांनी ब्रिगेडिअर जयंत कर आणि सहकाऱ्यांसह भेट घेतली. त्यांना डॉ. धर्मेंद्र पाटील जळगावचे असून, बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यात, तसेच आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करीत असल्याचे समजले. त्यांनी लेफ्टनंट जनरल चौधरी यांना कळविले असता, लेफ्टनंट यांनी डॉक्‍टरांच्या चमूला घरी बोलावत डॉ. पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. सोबतच कुठल्याही शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अडचण असल्यास आर्या फाउंडेशनतर्फे कळविल्यानंतर मदत करण्याचे आश्वासन दिले. 
------------------------ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com