पारोळा-धुळे महामार्गावर लक्झरी उलटली, 1 ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

पारोळा : येथील राष्टीय महामार्ग सहावर विचखेडे गावाजवळ जळगाव येथून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरीचा ओव्हरटेकच्या नादात वाहनवरून कंट्रोल सुटल्याने यात एक 20 वर्षीय तरुणी ठार होउन, तब्बल 35 प्रवाशी गंभीर जखमी झालेत.

पारोळा : येथील राष्टीय महामार्ग सहावर विचखेडे गावाजवळ जळगाव येथून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरीचा ओव्हरटेकच्या नादात वाहनवरून कंट्रोल सुटल्याने यात एक 20 वर्षीय तरुणी ठार होउन, तब्बल 35 प्रवाशी गंभीर जखमी झालेत.

सदर घटना ही ठीक रात्री साडेअकराच्या सुमारास झाली. जळगाव येथून सिंडिकेत फर्मची लक्झरी एकूण 45 ते 55 प्रवाशी घेऊन मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना विचखेडे गावाजवळ लक्झरी ओव्हर टेकच्या नादात रस्त्याच्या खाली उतरत खोल खड्ड्यात पडली. तिने दोन पलटी खाल्यात यात 22 वर्षीय तरुणी समा भिकन सूर्यवंशी (रा. ठाणे) हिचा जागीच मृत्यू झाला. तर मगन मोरे (वय40, जळगाव), हिरेंद्र पाटील (जळगाव), अखलाद अहमद अजूनबी (वय 59 एरंडोल), भिकन सूर्यवंशी (ठाणे, वय 36), रोहन सूर्यवंशी (वय 10), नंदू पाटील (वय 7), साहू पाटील (वय  5), मनोहर पाटील (सर्व राहणार कल्याण), एकनाथ नामदेव पाटील (एरंडोल), चेतना राजेंद्र चढा (वय 45), दिया झंवर (वय 7), अन्वर देशमुख, ओंकार धर्माधिकारी भांडुप, वत्सलाबाई ठाकूर, भावेश सूर्यवंशी (वय 10), रोशन सूर्यवंशी (वय 12), जळगाव, विजय बोरसे (धरणगाव), साहद अहमद पटेल, आसिफ तडवी (वय 34), परवीन तडवी (वय 30), सुमय्या पटेल (वय 52), सानिया पटेल (वय 8), आलिया पटेल (वय 6) सर्व राहणार सुरत, अफसर बी पटेल (वय 52) यांच्यासह अजून 8 ते 10 प्रवाशी गंभीर जखमी झालेत.

रुग्णवाहिका चालकांची सेवा 
यावेळी रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, दीपक सोनार यांनी अपघात स्थळी तात्काळ भेट देऊन सर्व रुग्णांना कुटीर रुग्णालय येथे आणले त्यामुळे अनेकांवर तातडीने उपचार झालेत. यावेळी डॉ. योगेश साळुंखे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. चेतन बडगुजर, डॉ. योगेंद्र पवार यांनी अनेक रुग्णांनावर प्राथमिक उपचार केलेत. अपघातातील 8 ते 10 रुग्ण धुळे येथे हलविण्यात आले होते. यावेळी रुग्णांचे मित्र व नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 dies in accident of Luxury at Parola Dhule Highway