Nandurbar News : जिल्ह्यातील 1 हजार 64 दुकाने 3 दिवस राहणार बंद

Free Ration News
Free Ration Newsesakal

नंदुरबार : शासनाने मोफत धान्य देऊन रेशनिंगची (Ration) दुकाने पूर्णतः बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. (1 thousand 64 ration shopkeepers have decided to close their shops from 7 till February 9 nandurbar news)

त्यामुळे कंटाळून निम्मे परवानाधारक राजीनामे देतील आणि इतर परवानाधारक कारणे दाखवून दुकाने बंद करतील अशी मोदी सरकारची योजना असल्याचा आरोप करीत नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार ६४ रेशन दुकानदारांनी मंगळवार (ता. ७)पासून ९ फेब्रुवारीपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.

याबाबत सोमवारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

त्यात म्हटले, की नंदुरबार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना महासंघातर्फे ७ ते ९ फेब्रुवारी या तीन दिवशी ऑल इंडिया फेअर शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली संलग्नित अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघातर्फे दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Free Ration News
Nashik News : मद्यपी तरुणाने लावली स्वत:च्या घराला आग

प्रसिद्धीपत्रकावर संजय चौधरी, प्रमोद बोडखे, नाना ठाकरे, जे. बी. शर्मा, शुभम रघुवंशी, ए. एम. अग्रवाल, प्रताप चौधरी, सदाशिव राजपूत, सुनील वैद्य, सु. भा वैद्य, प्रकाश चौधरी, अक्षय चौधरी, चंद्रकांत सोनार, अरविंद कुवर, उद्धव पिंपळे, महेंद्र चव्हाण, धारासिंग पावरा, लक्ष्मीबाई समुद्रे, सतीश अग्रवाल, देवीदास आल्हाटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दोन टप्प्यांत आंदोलन
रेशनिंग दुकानदार दोन टप्प्यांत आंदोलन करणार आहेत. पहिला टप्पा हा असून, ७ ते ९ फेब्रुवारी या दिवशी दुकाने बंद ठेवणार आहेत, तर पुढील महिन्यात २२ मार्चला दिल्लीत संसद भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एकजूट दाखविणे गरजेचे
केंद्र सरकारने मोफत धान्य वितरणाचा निर्णय घेऊन स्वस्त धान्य दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातलेली रेशनिंगची दुकाने बंद झाल्यास दुकानदारांवर उपासमारीची वेळ येईल व त्यांचे कुटुंब देशोधडीला लागेल. त्यामुळे दुकानदारांनी एकजूट दाखवावी, नागरिकांनी सहकार्य करावे. -नेमीचंद जैन, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

Free Ration News
Nashik News : लखमापूरला कात्रण गोडावूनला आग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com