नाशिक: चांदवडजवळ अपघातात कल्याणचे 10 जण ठार

सुभाष पुरकर
गुरुवार, 7 जून 2018

आडगांव (ता. चांदवड) येथील हॉटेल महाराणासमोर आज सकाळी 6 च्या सुमारास मिनी बसचा (क्र.mh 05 RO 357) टायर फुटल्याने ती वाळूने भरलेल्या ट्रकवर (क्र mh 15 क 8422) जाऊन आदळली. या भीषण अपघातात 10 जण ठार तर 11 गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ आज (गुरुवार) सकाळी मिनी बसचे टायर फुटून ट्रकवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार, तर 11 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आडगांव (ता. चांदवड) येथील हॉटेल महाराणासमोर आज सकाळी 6 च्या सुमारास मिनी बसचा (क्र.mh 05 RO 357) टायर फुटल्याने ती वाळूने भरलेल्या ट्रकवर (क्र mh 15 क 8422) जाऊन आदळली. या भीषण अपघातात 10 जण ठार तर 11 गंभीर जखमी झाले आहेत. गाडीतील सर्व प्रवाशी कल्याण येथील असून ते मध्यप्रदेशात् उज्जैन येथून देवदर्शन अटोपुन घरी जात होते. जखमींमधील 4 जण गंभीर असून त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मृतांची ओळख पटविण्यात येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: 10 dead in accident near Nashik Chandwad