Latest Marathi News | सोनगीर पोलिसांनी पकडला 10 लाखाचा गांजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nandurbar News : सोनगीर पोलिसांनी पकडला 10 लाखाचा गांजा

सोनगीर : येथील पोलिसांनी अमली पदार्थ वाहतुकीविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. शनिवारी (ता. १०) पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी एका कारमधून सुमारे दहा लाखाचा गांजा सदृश अमलीपदार्थ व पाच लाखाची कार असा १५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

शिरपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कारला (एमएच ०५ एएस ०४२५) गस्तीवर असलेल्या पोलिसांनी टोलप्लाझाजवळ संशय आला. मात्र, चालकाने न थांबविता कार सरवड गावाकडे दामटत नेली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. चालक कार सरवडच्या पुढे सोडून पसार झाला. (10 lakh ganja seized by Songir police Jalgaon News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Dhule News : Water grid योजनेला 274 कोटी मंजूर

कारची तपासणी केली असता ११९.५६ किलोग्रॅम वजनाचा व नऊ लाख ५६ हजार ४८० रुपये किमतीचा गांजा सदृश पदार्थ आढळून आला. कारमध्ये चालकाचे आधार कार्ड व पॅन कार्ड मिळाल्याने संशयित चालकाचे नाव ज्ञानेश्वर सुकदेव मोहिते (रा. भानास हिवरेशिवार जि. नगर) असे असल्याचे समजते.

पोलिस विशाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक संदीप दरवडे, अजय सोनवणे, संजय देवरे, शाम हिरे, नाईक अमरिश सानप, सूरजकुमार सावळे, विजयसिंग पाटील, अमोल ढिवरे, संजय जाधव, रमेश गुरव, कमलेश महाले, रामकृष्ण बोरसे, राकेश ठाकूर यांनी कारवाई केली. उपनिरीक्षक रवींद्र महाले तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : लाच घेताना घोटीतील पोलिसाला अटक