दुभाजकावर वऱ्हाडाचे वाहन आदळल्याने नवरदेवासह दहा जण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नवरदेव समाधान पाटील याच्या हातापायास गंभीर दुखापत झाल्याने त्यास धुळे येथे हलविण्यात आले आहे.

पारोळा : भरवस (ता. अमळनेर) येथील नवरदेवासह वऱ्हाडी पैठणला लग्नाला जात असताना त्यांचे चारचाकी वाहन रत्नापिंप्री (ता. पारोळा) येथील दुभाजकावर आदळले. ही घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. यात नवरदेवासह दहा जण जखमी झाले. 

नवरदेव समाधान पाटील याच्या हातापायास गंभीर दुखापत झाल्याने त्यास धुळे येथे हलविण्यात आले आहे. स्वप्नील साहेबराव पाटील (35), सिमू रवींद्र पाटील (30), मनिषा दगडू पाटील (वय 25), संगीता सोनू पाटील (24), अश्‍विनी प्रवीण सूर्यवंशी (16), पियुष दगडू पाटील (सहा), हर्षदा कांतिलाल पाटील (16), दगडू साहेबराव पाटील (20), कविता समाधान पाटील (30), नंदिनी भास्कर देशमुख (60) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: 10 people injured in accident near parola

टॅग्स