Nandurbar Crime News : विनापरवाना 11 लाखांचे कापूस बियाणे जप्त

11 lakh worth of cotton seeds seized without licence nandurbar crime news
11 lakh worth of cotton seeds seized without licence nandurbar crime newsesakal

Nandurbar News : गुजरातमधील बडोदा येथून विनापरवाना येणारे ११ लाख किमतीचे ८५७ पाकीट कापूस बियाणे कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडले.

तालुक्यात ही पहिलीच सर्वांत मोठी कारवाई असून, बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या वेळी ११ लाख किमतीचे बियाणे व वाहन जप्त करण्यात आले. (11 lakh worth of cotton seeds seized without licence nandurbar crime news)

सारंगखेडा (ता. शहादा) पोलिस ठाण्यांतर्गत (ता. २६) सायंकाळी पाचला जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना गुप्त माहितीच्या आधारे विनापरवाना कापूस बियाणे खासगी वाहनाने येत असल्याचे समजले.

त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पानपाटील व शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी अधिकारी योगेश हिवराळे, अभय कौर यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून वाहन (जीजे ०६, पीसी ३५३२) अडविली व विचारपूस केली असता वाहनचालक चंद्रकांत पांढुरंग माळी (रा. कळंबू, ता. शहादा) हा स्वतः वाहन चालवत असून, विनापरवाना बियाणे गुजरातमधून बडोदा जिल्ह्यातून आणत असल्याची कबुली दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

11 lakh worth of cotton seeds seized without licence nandurbar crime news
Jalgaon Fraud Crime : 28 लाखांची 2 दुकाने परस्पर पत्नीच्या नावे; संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार तानाजी खर्डे व प्रकाश खरमाळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार तसेच संजय शेवाळे, तंत्र अधिकारी गुणनियंत्रण यांच्या मार्गदर्शन व परवानगीने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

वाहनात एकूण १३ पोती (८५७ पाकिटे) अंदाजित रक्कम ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपीवर बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याचे काम सारंगखेडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

बोगस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले

दरम्यान, कृषी विभागाच्या भरारी पथकाने बियाण्याची गाडी पकडली असल्याची माहिती कर्णोपकर्णी तालुकाभर पसरल्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले. काहींनी आपला माल सुरक्षित स्थळी हलविण्याचे चर्चेतून उमटत होते.

11 lakh worth of cotton seeds seized without licence nandurbar crime news
Cotton Rate: सात महिने घरात कापूस सांभाळूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com