बी. एस्सी.तील "लिनिअर अलजेब्रा'चा पेपर फुटला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेल्या बी. एस्सी. अभ्यासक्रमाचा पेपर फुटल्याचा प्रकार आज येथे उघडकीस आला आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल (ता.27) मध्यरात्री प्रश्‍नपत्रिका मिळवत आज परीक्षेच्या नियोजित वेळेत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर धडक मारली. यावेळी खातरजमा केली असता, "लिनिअर अलजेब्रा'विषयाचा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराची चौकशी करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे. 

यासंदर्भात "आप'चे जितेंद्र भावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे पेपर आधल्या दिवशी रात्री उशीरा विक्री केले जात असल्याचे समजले. यानंतर काल (ता.27) कार्यकर्त्यांनी द्वितीय वर्ष बी. एस्सी. अभ्यसक्रमाच्या "लिनिअर अलजेब्रा' या विषयाच्या पेपरची झेरॉक्‍स प्रत मिळविली. त्यानंतर आज सकाळी अकराला पेपरची वेळ असल्याने या वेळी "आप'च्या कार्यकर्त्यांनी बिटको महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर धडक मारली.

यावेळी परीक्षा केंद्रावर वितरीत केलेला पेपर व बाहेर उपलब्ध झालेली झेरॉक्‍सची प्रत यांतील प्रश्‍न सारखे असल्याने कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा भांडाफोड केला. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, तसेच आतापर्यंत झालेले सर्व पेपर रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

चौकशीचे कुलगुरूंनी दिले आश्‍वासन 
दरम्यान या संदर्भात पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अमित पाटील यांनी कुलगुरूंशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच अमित पाटील व अजिंक्‍य गिते यांनी पेपर फुटी प्रकरणाची चौकशीची मागणी केली. दरम्यान घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन कुलगुरूंनी यावेळी दिल्याचे समजते. 

बी. एसस्सी. अभ्यासक्रमाचा पेपर आधल्या दिवशी उपलब्ध होत असल्याचा प्रकार आमच्या लक्षात आला होता. आम्ही फुटलेल्या पेपरची झेरॉक्‍स प्रत परीक्षेत वितरीत केलेल्या प्रश्‍नपत्रिकेशी तपासून पाहिली असता, या प्रकाराचा भांडाफोड झाला. या प्रकाराच्या चौकशीसह सर्व पेपर पुन्हा घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. 
-जितेंद्र भावे, "आप' कार्यकर्ते