11.5 lakh worth fake liquor seized
11.5 lakh worth fake liquor seized

साडेअकरा लाखांचे बनावट मद्य जप्त

नंदुरबार : कोळदा - खोंडामळी (ता. नंदुरबार) रस्त्यावर अवैद्य बनावट मद्याची वाहतूक करतांना दोन चारचाकी वाहनासह सुमारे साडे अकरा लाखाचा बनवाट मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

काल (ता. २२) मध्यरात्री कोळदा - खोंडामळी रस्त्यावर एक महिंद्रा कंपनीची लोगान गाडी व टाटा व्हिस्टा गाडी असे दोन वाहने संशयीतरित्या येतांना पोलिस पथकाला दिसले.त्या वाहनांना थांबवून तपासणी केली असता वाहनाच्या मागील सीटवर व डिक्कीमध्ये विविध प्रकारचे विदेशी मद्य आढळून आले.

दोन्ही वाहनांमधील तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या विदेशी मद्यामध्ये मॅकडॉल नं. १ सहा बॉक्स व २८८ बाटल्या, इंपेरियल ब्ल्यु ६ बॉक्स २८८ व्ही-९०००) दुसरी एक टाटा कंपनीची व्हिस्टा वाहन क्र(एमएच-१९ए एक्स ४६२५), तीन विविध कंपनीचे मोबाईल्स, असे एकुण दोन वाहनात ११०४ मद्याचा बाटल्या वाहनासह जप्त करण्यात आले.हा विदेशी मद्यसाठा बनावट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

बनावट मद्यसाठा पुरवठादार नारायण माळी (रा. शिरपुर जि. धुळे), त्याचा सहकारी सचिन सोनवणे(रा मेथी,ता. शिंदखेडा ) हे पळून गेले. तर दिलीप नाना कोळी(रा. विखरण,ता नंदुरबार),विकास शिवाजी कोळी( रा. दलवाडे,ता शिंदखेडा),राहुल सुखलाल बोरसे(रा. दलवाडे.प्र. सो. चिमठाणे,ता शिंदखेडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून ११ लाख ३४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.अटकेतील तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या आदेशाने नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क अधिकारी युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी, प्रशांत पाटील,सुभाष बाविसकर, हेमंत पाटील,हंसराज चौधरी, अजय रायते,हर्शल नांद्रे यांनी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com