रिक्षा-मोटारीच्या धडकेत 12 प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

मनमाड - इंदूर-पुणे महामार्गावर कानडगाव शिवारात रिक्षा व मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात 12 प्रवासी रविवारी (ता. 15) जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांपैकी अत्यवस्थ तिघांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मनमाडकडे जाणारी ऍपे रिक्षा (एमएच 41 सी 5663) व मालेगावकडे जाणारी मोटार (एमएच 15 ई 3852) यांची कानडगाव येथे समोरासमोर धडक झाली. यात रिक्षाचा चक्काचूर झाला.

Web Title: 12 passenger injured in rickshaw motor accident