महापालिकेचे पाच शिक्षक सेवेतून बडतर्फ, चौकशीत दोषी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नाशिक : विविध तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या महापालिकेच्या पाच शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अजून तीन शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून पुढील आठवड्यात त्यावर निर्णय होईल. 

नाशिक : विविध तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या महापालिकेच्या पाच शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अजून तीन शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून पुढील आठवड्यात त्यावर निर्णय होईल. 

महापालिकेचे शिक्षक ज्ञानदेव पगार यांनी शिक्षकांसह नागरिकांना बॅंकांचे कर्ज प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्‍वासन देत दोन ते अडिच कोटी रुपयांची फसवणुक केल्याची तक्रारी होती. या तक्रारींवरून ते बाविस दिवस कारागृहात देखील होते. त्यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबन काळात देखील आडगाव येथे शिक्षकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. सर्वचं तक्रारींमध्ये महापालिकेच्या चौकशी समितीने दोषी ठरविल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आडगाव शाळेतील मुलींना लैंगिक छळ प्रकरणी मुरलीधर भोर या शिक्षकाबद्दल तक्रार होती.

बजरंग वाडी शाळेत दोन दाखल्यांसाठी प्रत्येकी दोनशे रुपयांची लाच मुख्याध्यापिका शैलजा मानकर यांनी मागितली होती. चौकशी समितीसमोर दोषी आढळले तर अफरातफरीवरून कळवण पोलिसांनी अटक केलेले हिरामण ढवळू बागुल यांच्यावरचे दोषारोप सिध्द झाले आहेत. सातपुर येथील शाळेच्या मुख्याध्यापिका लता गरड गैरहजर असताना देखील हजेरी पटावर हजर दाखवून महापालिकेचा पगार उकळल्याने त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. अशा पाचही शिक्षकांना महापालिकेने सेवेतून बडतर्फ केले आहे. पदवीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याच्या कारणावरून जयश्री पंगुळवाडे, दाखले देताना लाच घेतल्या प्रकरणी छाया गोसावी, शिष्यवृत्ती घोटाळ्याचा आरोप असलेले विजया भोसले या तिघा शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.