कारवाईत १४ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक - सिन्नर तालुक्‍यातील निऱ्हाळे शिवारात घोटेवाडी रस्त्यावर अवैधरित्या सुरु असलेल्या दारुच्या कारखान्यावर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी जप्त केलेला दारुसाठा.
नाशिक - सिन्नर तालुक्‍यातील निऱ्हाळे शिवारात घोटेवाडी रस्त्यावर अवैधरित्या सुरु असलेल्या दारुच्या कारखान्यावर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी जप्त केलेला दारुसाठा.

नाशिक - निऱ्हाळे येथील बंगल्याच्या तळघरात देशी-विदेशी मद्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला असून, दोघा भावांपैकी एकाला अटक केली. बोलेरो वाहनासह देशी-विदेशी १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या बंगल्यात अवैध मद्यसाठा असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती. त्यांनी या संदर्भात पथकाची निर्मिती करून स्वत: या पथकात सहभागी झाले आणि रविवारी रात्री या ठिकाणी छापा टाकला.  बंगल्याच्या एका बेडरूममध्ये झडती सुरू असताना तेथील कोपऱ्यातील बेडची तपासणी केली. त्या वेळी बेडच्या आतमध्ये खालच्या बाजूला पुन्हा कडी असलेला प्लाय होता. तो प्लाय संशयास्पद वाटल्याने तो उचकटून पाहिला असता, आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या होत्या आणि बंगल्याच्या खाली दुमजली तळघर उभारण्यात आलेले आहे. या तळघरात देशी-विदेशी मद्याचा कारखाना आढळून आला.

बंगल्याची खास उभारणी
निऱ्हाळे-वावी-घोटेवडी रस्त्यावर १५ फुटी संरक्षण भिंतीच्या आत हा बंगला आहे. बाहेरून कोणालाही काहीही दिसत नाही. बंगल्याच्या आसपासच्या हालचाली टिपण्यासाठी उच्चप्रतीचे नाइट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, त्यांची जोडणी थेट बंगल्याच्या हॉलमधील एलईडी टीव्ही, बेडरूम आणि तळघरातील मॉनिटरला होती. दोघेच यादव बंधू या ठिकाणी दमणमधून विदेशी मद्य आणायचे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com